लोकसभेला डावलले, सुभाष भोईर यांच्याकडून विधानसभेची तयारी, ठाकरेंकडून मेसेज?

प्रदीप भणगे, डोंबिवली : शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर हे मुख्यमंत्री शिंदेंसोबत न जाता ठाकरे गटात राहिले. ठाकरे गटाकडून त्यांना कल्याण लोकसभा संपर्क प्रमुखपद देण्यात आले होते. कल्याण लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. दरम्यान विधानसभा निवडणूक जवळ येताच माजी आमदार सुभाष भोईर सक्रिय झाले असून कल्याण ग्रामीण मतदार संघातून ते पुन्हा एकादा निवडणुकीसाठी तयारी करत असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली आहे.

ठाकरे गटाकडून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळू शकते अशी चर्चा असताना भोईर हे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमधील सफाई कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये दिसले. त्यामुळे विधानसभा निवडून जवळ येताच माजी आमदार सुभाष भोईर सक्रिय झाल्याची चर्चाआहे. दरम्यान या मोर्च्यामध्ये मनसे आमदार राजू पाटील आणि माजी आमदार सुभाष भोईर एकत्र दिसत होते, याचीही चर्चा रंगली.
Raju Patil : खोकेवाल्यांनी कंटेनर दिले, त्यामध्ये सुपाऱ्या की नारळ; मनसेचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

विधानसभेच्या तोंडावर सुभाष भोईर सक्रीय

लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे यांचा कल्याण लोकसभेचा दौरा झाला होता. यावेळी दौऱ्यात माजी आमदार भोईर न दिसल्याने ते नाराज होते. ते शिंदे गटात जातील अशी चर्चा होती. मात्र ते ठाकरे गटातच राहिले. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत वैशाली दरेकर यांचा प्रचार करताना भोईर कुठेही फारसे दिसले नाहीत. भोईर गेल्या ४ वर्षांत मतदारसंघात फारसे सक्रिय नव्हते. मात्र त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत हवा तेवढा संपर्क ठेवला होता. आता विधानसभेच्या तोंडावर मात्र भोईर सक्रीय झाले आहेत.
Thane News: सुट्ट्या पैशांवरुन वादाला तोंड फुटलं, तिकीट काउंटर कर्मचारी आणि प्रवाशामध्ये राडा, स्टेशनवरील व्हिडिओ व्हायरल

२०१९ साली शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट रद्द

भोईर यांनी २०१४ साली विधानसभा निवडणूक लढवित विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ साली शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट रद्द करत रमेश म्हात्रे यांना तिकीट दिले गेले होते. यामुळे भोईर नाराज होते. ठाण्यातून भोईर यांना कायम डावलले जात असल्याची चर्चा झाली. शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर भोईर यांना पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखविण्याची संधी निर्माण झाली आहे.

कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता

कल्याण ग्रामीण विधानसभेतून ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांना तिकीट दिले जाऊ शकते, तर शिंदे गटाकडून शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचे नाव आघाडीवर आहे. तर सध्या कल्याण ग्रामीण विधानसभेत मनसेचे आमदार राजू पाटील आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते.

Source link

Kalyan Raural ConstituencyShiv Sena Subhash BhoirSubhash BhoirSubhash Bhoir Contest Vidhan Sabhaकल्याण ग्रामीण सुभाष भोईरसुभाष भोईर विधानसभा लढणारसुभाष भोईर शिवसेना कल्याण भोईर
Comments (0)
Add Comment