Nagpur News : नागपुरात मनसे आक्रमक, नियम सांगितला; कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला

नागपूर : संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे नेते अनेक सभा, दौरे करताना दिसत आहेत. नुकताच राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा पार पडला. १० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा समारोप झाला. राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या आक्रमक पद्धतीने विधानसभेची तयारी करताना दिसत आहे. यातच पुन्हा एकदा टोल नाक्यांबाबत मनसे आक्रमक झाली असून नागपुरात मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर हल्ला केल्याचं समोर आलं आहे.

नियमाविरुद्ध जात वाहन चालकांकडून टोल वसुली

शहराच्या ३० किलोमीटरच्या परिसरात कोणताही टोलनाका उभारू नये, असा नियम असताना वाहन चालकांकडून टोल वसूल केला जात असल्याचा आरोप करत, मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तसंच टोलनाक्याची तोडफोड केली. यावेळी पोलिसांनी मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Uddhav Thackeray : माझ्या पायाशी कोणीतरी टरबूज ठेवलंय, ढेकनांना आव्हान नसतं, अंगठ्याने चिरडायचं; उद्धव ठाकरेंचा टोला

टोल नाक्यावर मनसे स्टाईल आंदोलन

नागपुरात वाडी शहराभोवती राज्य महामार्गावर १० किमी अंतरावर तीन टोल नाके आहेत. या तिन्ही टोल नाक्यांवर खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नाही. मात्र, व्यावसायिक वाहनांकडून टोल वसूल केला जातो. टोल नाके जवळ असल्याने माल वाहतूक करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. माल वाहतूकदारांच्या या तक्रारीनंतर मनसेने आज टोल नाक्यावर जात मनसे स्टाईलने आंदोलन केलं.
Kolkata Doctor Murder Accused : चार लग्न; अश्लील व्हिडिओ अन् दारुचं व्यसन; विकृत आरोपीबाबत धक्कादायक गोष्टी समोर

निवडणुकीपूर्वीच मनसे आक्रमक

आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर अकोल्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दगडफेक करून काचा फोडल्या होत्या. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर त्यांच्या गाडीवर नारळ आणि शेण फेकण्यात आलं. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या उत्तराचं समर्थन केलं असून त्याचं उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल असंही सांगितलं आहे. त्यामुळे आता निवडणुकीपूर्वीच मनसे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
नागपुरजवळील टोल नाक्यांवर तोडफोड करुन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची आठवण करून दिली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका तोडफोड करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याशिवाय काही वर्षांपूर्वी मनसेने टोल नाक्यावर कडाडून विरोध केला होता. त्यानंतर अनेक टोल नाके बंद झाले.

Source link

NagpurNagpur newsnagpur toll naka mns todfodraj thackeray nagpur mns toll naka attackनागपूर टोल नाका मनसेकडून तोडफोडनागपूर बातमीनागपूर विधानसभाराज ठाकरे नागपूर मनसे टोल नाका हल्ला
Comments (0)
Add Comment