Nagpur Drug Case: नागपुरात ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश; ५२ किलो एमडीसह ७८ कोटी रुपयांचे साहित्य जप्त

म. टा. प्रतिनिधी,नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने रविवारी नागपुरातील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाळाभाऊ परिसरात छापा टाकून ड्रग्ज (एमडी) निर्मिताचा कारखाना उघडकीस आणला. या कारवाईमुळे ड्रग्स तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, डीआरआयच्या पथकाने चार जणांना अटक केली. या कारवाईमुळे नागपुरात मोठ्या प्रमाणात एमडीची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. आकाश हारोडे, साहिल शेख, सुमित घोनमोडे व दिव्यांशू,अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत.

काय प्रकरण?

बाळाभाऊपेठेत चौघांनी द्रव्य एमडीचे रुपांतर एमडी पावडरमध्ये तयार करण्यासाठी कारखाना सुरू केला. यायाबाबत माहिती मिळताच डीआरआयने सापळा रचला. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास डीआरआयचे ३५ अधिकाऱ्यांचे पथक पाचपावलीत धडकले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने बाळाभाऊपेठेतील इमारतीत छापा टाकला. पथकाने १८ तास याठिकाणी झाडाझडती घेतली. झडतीत मेफेड्रॉन निर्मितीसाठी आवश्यक असलेली रसायने, साहित्य आणि यंत्रासह प्रयोगशाळा आढळली. डीआरआरच्या पथकाने येथून १०० किलोपेक्षा अधिक एमडी तयार करण्याची क्षमता असलेल्या कच्च्यामालासह ७८ कोटी रुपयांचे साहित्य जप्त केले. डीआरआयच्या पथकाने चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची डीआरआय कोठडीत रवानगी केली. याप्रकरणाचा डीआरआयसह एनसीबीही तपास करीत आहे.

तस्कराची आत्महत्या

डीआरआयच्या पथकाने जून महिन्यात दीपक मच्छींद्र देसाई (वय २७, रा.हातखोला, तासगाव, सांगली) याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक केली. डीआरआयच्या पथकाने त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने नागपुरात काही तस्कर एमडीचा कारखाना स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. या माहितीमुळे डीआरआयचे पथक सक्रिय झाले. तस्कर आपल्याला सोडणार नाहीत,या भितीमुळे दीपकने १५ जूनला डीआरआयच्या सेमिनरी हिल्सच्या सीजीओ कॉम्प्लेक्समधील व्ही विंगमधील सहावा माळा येथून उडी घेऊन आत्महत्या केली होती. दीपकच्या आत्महत्येचा तपास सीआआयडी करीत आहे.

Pune Drugs Case: शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्जचं साम्राज्य, पुण्यात तब्बल एक कोटीचे अमली पदार्थ जप्त
राजस्थान, मुंबई कनेक्शन

आकाश हारोडे, साहिल शेख, सुमित घोनमोडे व दिव्यांशू यांनी चार दिवसांपूर्वी पाचपावलीत इमारत भाड्याने घेतली. दोन दिवस त्यांनी साहित्य खरेदी केले. प्रयोगशाळा स्थापन केली. एमडी तयार करायला सुरुवात करताच डीआरआयच्या पथकाने छापा टाकला. काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये एमडीची मोठी खेप पकडण्यात आली होती. यातील तस्करांसोबत या चौघांचा संबंध असण्याची शक्यता आहे. या टोळीचे राजस्थान व मुंबई कनेक्शन असल्याची शक्यता असून, डीआरआयचे पथक या दिशेनेही तपास करीत आहेत.

Source link

DRIdrug case accusedmd seized in nagpurNagpur Drug Casenagpur mumbai drugs connectionनागपूर बातम्यामहसूल गुप्तचर संचालनालयमेफेड्रॉन जप्त
Comments (0)
Add Comment