Neelam Gorhe: सहा महिने न दिसणारा चेहरा नको, ठाकरेंना टोला, नीलम गोऱ्हेंनी सांगितला मनातला मुख्यमंत्री

म.टा. खास प्रतिनिधी, नाशिक : राज्य सरकार लोकाभिमुख निर्णय घेत असल्याने विरोधकांच्या प्रयत्नांना यश येणार नाही, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी रविवारी नाशिकमध्ये विरोधकांवर टीका केली. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

योजनेला बदनाम करण्याचे षडयंत्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रेनिमित्त नाशिक दौऱ्यावर असलेल्या गोन्हेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, महिलांचा सन्मान, संधी व आर्थिक सक्षमीकरण या त्रिसूत्रीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. मात्र, विरोधक योजनेच्या भवितव्यावरून समाजात चुकीची माहिती पसरवित आहेत. योजनेला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ला…

तुमची सत्ता असणाऱ्या कर्नाटक, तामिळनाडूमध्ये ही योजना चालते. परंतु, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असल्याने त्याला विरोध कितपत सयुक्तिक आहे , अशा शब्दांत गोन्हे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत डॉ. गोहे म्हणाल्या, ‘महाराष्ट्राने आजपर्यंत अशा पद्धतीने भाषिक जहरीपणा पाहिला नाही. प्रत्येकाला त्याचा पक्ष आणि नेत्याबद्दल प्रेम व जिव्हाळा असतो. माझ्यावरही अनेकदा हल्ले झाले. परंतु, सध्याची राजकीय परिस्थिती बिकट असून, प्रत्येकाने संयम राखावा .’ असे यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Shivsena Vs MNS: राज ठाकरेंच्या नादाला लागू नका, आज ठाण्यात, उद्या तुमच्या घरापर्यंत येऊ, मनसे नेत्याचा इशारा
सहा महिन्यांनी भेटणारा मुख्यमंत्री नसावा …

महाविकास आघाडीकडून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा माणून पुढे आणले जाते आहे . याबद्दल डॉ. नीलम गोन्हे यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या , मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्या मजल्यावर सुशीलकुमार शिंदे यांचे नाव अंतिम झाले असताना विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री करण्यात आले . राजकारणात ऐनवेळी काहीही होऊ शकते . राज्याला लोकाभिमुख मुख्यमंत्री हवा. सहा महिन्यांनी भेटणारा नको, असा टोलाही त्यांनी लगावला.

Source link

Eknath Shindemaharashtra governmentneelam gorheneelam gorhe interviewneelam gorhe on eknath shinde groupUddhav Thackerayनाशिक बातम्यामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाविधान परिषद उपसभापती नीलम गोन्हेविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment