Praful Patel : भाजपला आमच्यापेक्षा अधिक जागा मिळतील; जागावाटपाबाबत प्रफुल्ल पटेल यांचे वक्तव्य

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : महायुतीत विधानसभेच्या जागा वाटपाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. तीन पक्षांत जागावाटप करायचे असल्याने थोडा वेळ लागत असून, भाजपचे जास्त आमदार असल्यामुळे त्यांना आमच्यापेक्षा थोड्या अधिक जागा मिळतील. जागा वाटपावरून कोणतीही भांडणे होणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केला.

जनसन्मान यात्रेनिमित्त शिर्डीहून मुंबईकडे निघालेल्या पटेल यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘अजित पवारांची लोकप्रियता, त्यांनी केलेले काम लोकांना माहित असून लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला अधिक चांगले चित्र दिसेल, असे पटेल म्हणाले. लोकसभेच्या काळातील ‘फेक नरेटिव्ह’ लोकांना समजले असून, आमचे चुकले असे लोकही आता बोलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यामुळे त्याचा फायदा प्रत्येक मतदारसंघातील सामान्य नागरिकांना होत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रात अंदाजे अडीच कोटी महिलांना होणार आहे. ही योजना कायमस्वरूपी असणार आहे. योजनेमुळे आमच्याकडे लोकांचा ओघ वाढल्याने विरोधक टीका करीत आहेत, असेही पटेल म्हणाले. संजय राऊत हे दररोज सकाळचा साडेनऊचा भोंगा असल्याचे ते म्हणाले. मनसे नेते राज ठाकरे आणि आमचा काहीही संबंध नाही. राज ठाकरे आमच्या विरोधातही उमेदवार देऊ शकतात. अंजली दमानिया काहीही आरोप करीत असतील, तर त्यावर अजित पवारांनी उत्तरे देत बसायचे का असा सवालदेखील पटेल यांनी केला.
Ajit Pawar: मी कालच ६००० कोटींच्या फाईलवर सही केली आहे! अजित पवारांचा ‘लाडक्या बहिणीं’ना शब्द
योजना पाच वर्षे सुरु राहणार – सुनील तटकरे
देवळा : ‘राज्यातील विरोधकांकडून लाडकी बहीण या योजनेसंदर्भात शंका घेत जनतेची दिशाभूल केली जात असली तरी ही योजना सलग पाच वर्षे सुरू राहणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेनिमित्त खासदार तटकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे भेट देऊन येथील शिवस्मारकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी प्रास्ताविक केले. गोरख निकम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी देवळा नगरपंचायतीचे गटनेते संतोष शिंदे ,जगदीश पवार, अश्विनी आहेर, मनोज गुजरे, मनोहर खैरनार, मनोज आहिरराव आदींसह महिला वर्ग उपस्थित होते.

Source link

Jansanman Yatranashikroad railway stationncp leader praful patelpraful patelSanjay Rautनाशिक बातम्याभाजपराष्ट्रवादी काँग्रेस पक्षविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment