म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची धडपड सुरू असते. दुसरीकडे या गरजवंतांना शोधण्यासाठी खासगी एजंटही आटापिटा करत असतात. गरजेनुसार हवी तेवढी, हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या बजेटमध्ये ही एजंट मंडळी घर शोधतात आणि ते घर विकायचे असल्याचे भासवून फसवणूक करतात. म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देतो, असे सांगून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे घराच्या शोधात असलेल्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.वडाळा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका फेरीवाल्याकडे एक अधिकारी आणि त्याचा चालक नियमित येत असे. अनिल पवार असे नाव सांगणाऱ्या चालकाने आपला मालक कलीम शेख हा म्हाडामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे त्याने फेरीवाल्यास सांगितले. घराच्या शोधात असल्याचे फेरीवाल्याने पवार यांना सांगताच शेखसाहेब स्वस्तात घर मिळवून देतील, अशी बतावणी केली. त्यानुसार वडाळा येथे म्हाडाचे एक घर असून ते सवलतीच्या दरामध्ये मिळवून देतो असे प्रलोभन शेख आणि पवार यांनी दाखवले. कधी देकार पत्र, कधी नोंदणी तर कधी ताबापत्र अशी वेगवेगळी कारणे सांगून शेख आणि पवार यांनी फेरीवाल्याकडून चार लाख ११ हजार रुपये घेतले. फेरीवाल्याचा विश्वास बसावा यासाठी म्हाडाचे शिक्के, खोट्या सह्यांची पत्रे त्याला दिली. मात्र घर काही मिळाले नसल्याचे फेरीवाल्याने तक्रारीत म्हटले आहे.
पवई येथे वास्तव्यास असलेले निवृत्त बँक अधिकारी मालकीच्या घराच्या शोधात होते. याचवेळी त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीने करुणाकर पुजारी नावाच्या व्यक्तीसोबत ओळख करून दिली. पुजारी याने पवई तुंगा येथील म्हाडाचे ९७० चौरस फुटांचे घर ८५ लाख रुपयांत नावावर करून देतो असे सांगितले. इतके मोठे घर केवळ ८५ लाखांत मिळत असल्याने निवृत्त अधिकारी आणि त्याच्या पत्नीने यासाठी होकार दिला. त्यानंतर टप्याटप्याने कधी रोख तर कधी डीडी स्वरूपात पुजारी आणि त्याचा सहायक सनी यांना तीस लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम गृहकर्जातून देणार असल्याने निवृत्त अधिकाऱ्याने पुजारी याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र तो टाळाटाळ करत असल्याने त्याच्या वागणुकीवर संशय आला. निवृत्त अधिकाऱ्याने पुजारी येणे दिलेल्या पावत्या म्हाडा कार्यालयात नेऊन दाखवल्या. या पावत्या बनावट असल्याचे म्हाडा कार्यालयातून सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुजारी आणि सनी यांच्याविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.फसवणुकीच्या आणखी काही घटना
पवई येथे वास्तव्यास असलेले निवृत्त बँक अधिकारी मालकीच्या घराच्या शोधात होते. याचवेळी त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीने करुणाकर पुजारी नावाच्या व्यक्तीसोबत ओळख करून दिली. पुजारी याने पवई तुंगा येथील म्हाडाचे ९७० चौरस फुटांचे घर ८५ लाख रुपयांत नावावर करून देतो असे सांगितले. इतके मोठे घर केवळ ८५ लाखांत मिळत असल्याने निवृत्त अधिकारी आणि त्याच्या पत्नीने यासाठी होकार दिला. त्यानंतर टप्याटप्याने कधी रोख तर कधी डीडी स्वरूपात पुजारी आणि त्याचा सहायक सनी यांना तीस लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम गृहकर्जातून देणार असल्याने निवृत्त अधिकाऱ्याने पुजारी याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र तो टाळाटाळ करत असल्याने त्याच्या वागणुकीवर संशय आला. निवृत्त अधिकाऱ्याने पुजारी येणे दिलेल्या पावत्या म्हाडा कार्यालयात नेऊन दाखवल्या. या पावत्या बनावट असल्याचे म्हाडा कार्यालयातून सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुजारी आणि सनी यांच्याविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फसवणुकीच्या आणखी काही घटना
– पवई येथील एमएमआरडीएच्या प्रकल्पात घर मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून तिघांनी एका दुकानदाराची तब्बल ४२ लाखांची फसवणूक केली
– म्हाडाचा जोगेश्वरी येथे असलेले घर अन्य ठिकाणी हस्तांतरित करून देतो सांगून एका महिलेकडून तिघांनी सहा लाख रुपये घेतले.
– म्हाडाचे बनावट देकार पत्र देऊन मानखुर्द येथील एका तरुणाला १२ लाखांचा गंडा घालण्यात आला.