रवी राणा यांचे खळबळजनक वक्तव्य, तर लोणावळ्याशिवाय पुणे गाठता येणार

१. ‘मला तुमचे आशीर्वाद, सहकार्य हवे आहे. लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावा. आमचे सरकार आल्यास तीन हजार रुपये देऊ. परंतु आशीर्वाद न देणाऱ्या बहिणींजवळून पंधराशे रुपये परत घेऊ, असे खळबळजनक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…
२. आगामी विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, मुंबईतील ३६ जागांसाठी तब्बल दोनशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज केल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. यात सर्वाधिक अर्ज हे वर्सोवा आणि धारावी मतदारसंघातून दाखल करण्यात आले आहेत.

३. कोकणी माणसांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने अखेर माफी मागितली आहे. कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, ते शब्द माझ्या तोंडून अनवधानाने निघाले, अशा शब्दात मुनव्वरने माफी मागितली आहे. भाजप नेते नितेश राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि नेटिझन्सनी हिसका दाखवल्यानंतर मुनव्वरने माघार घेतली. अधिक बातमी वाचा सविस्तर…

४. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने ठाणेकर रहिवासी कोकणातील आपल्या गावी जातात. बसेसअभावी त्यांच्यासह अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटीच्या ठाणे विभागाने खास गणेशोत्सवानिमित्त नियमित बसेस व्यतिरिक्त २ हजार २३ जादा बसेसची सोय केली आहे.

५. डोक्यावर जवळपास दहा कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने त्रासलेल्या जोडप्याने आयुष्याची अखेर केली. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील सराफा व्यावसायिकाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने पत्नीसह बाईकने ८० किमीचा प्रवास करुन उत्तराखंड येथील हरिद्वार गाठले. त्यानंतर हरकी पायडी येथून गंगा नदीत उडी घेत आत्महत्या केली. गंगानगर येथे पतीचा मृतदेह सापडला, तर पत्नीचा शोध अद्याप लागलेला नाही.

६. मुंबई आणि पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मध्य रेल्वेने चाकोरीबाहेरील उपायांवर काम सुरू केले आहे. कर्जत ते तळेगाव (७२ किमी) आणि कर्जत ते कामशेत (६२ किमी) हे दोन नवे रेल्वे मार्ग तयार करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव आहे. नव्या मार्गामुळे लोणावळा टाळून रेल्वे प्रवाशांना पुणे गाठता येणार आहे. नव्या मार्गावर मेल-एक्स्प्रेसचा वेग दुप्पट होईल, शिवाय नव्या १० रेल्वेगाड्या चालवण्याचा पर्यायही खुला होणार आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…

७. बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव पुन्हा एकदा अडचणीत कचाट्यात सापडला आहे. राजपाल यादवची कोट्यवधींची मालमत्ता बँकेने जप्त केल्याचे बोलले जात आहे. ही बाब २०१२ ची आहे. त्यावेळी राजपाल यादव अता पता लापता हा सिनेमा स्वत: दिग्दर्शित करत होता. तर त्याची पत्नी राधा यादव या सिनेमाची निर्माती होती.

८. स्टार भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर भारतात परतणार नसल्याचे म्हटले जाते. नीरज किमान एक महिन्यानंतरच भारतात परतण्याची शक्यता सध्या तरी दिसते.

९. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे ज्युनियर महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्याप्रकरणाने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी संजय रॉयने अत्यंत क्रूर आणि अमानवी पद्धतीने या महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची हत्या केली. तिच्या शवविच्छेदन अहवालात अशा गोष्टी समोर आल्या आहेत ज्या वाचून अंगाचा थरकाप उडेल.

१०. भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. अमेरिकेतून आलेल्या मंदीच्या संकेतांनी बाजाराला खड्ड्यात घातले असून जागतिक शेअर मार्केट तेजीच्या रुळावर परतले असूनही देशांतर्गत मार्केटमध्ये रिकव्हरी होताना दिसत नाही तर, त्याऐवजी शेअर बाजारातील घसरण आणखी खोलवर जात आहे. सोमवार सेन्सेक्स मोठ्या घसरणीसह बंद झाल्यावर मंगळवारी बीएसई सेन्सेक्सने किंचित घसरणीसह सुरुवात केली तर निफ्टीमध्ये किंचित तेजी नोंदावली गेली.

Source link

maharashtra breaking newstodays top newsTop 10 Newsआजच्या ठळक बातम्याटॉप १० बातम्यामहाराष्ट्र ब्रेकिंग बातम्या
Comments (0)
Add Comment