Surya Sankarman 2024 : जेव्हा ग्रहांचे संक्रमण होते तेव्हा त्याचा प्रभाव प्रत्येक राशींवर पडत असतो. 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तब्बल एक वर्षानंतर हे राशी परिवर्तन होणार आहे. सिंह ही सूर्याची राशी असल्यामुळे जेव्हा सूर्य स्वतःच्या राशीत येतो तेव्हा तो अधिक बलवान होतो आणि शुभ स्थितीत मानला जातो. सूर्याच्या संक्रमणामुळे पुढचे ३० दिवस मेष आणि सिंह राशीसह या 5 राशींसाठी प्रत्येक दिवस सर्वोत्तम आणि प्रगतीशील असणार आहे. या राशीच्या जातकांचे नशिब सूर्यासारखे चमकेल तसेच व्यवसायात अपेक्षित यश मिळेल आणि नोकरीतही अनेक उत्तम संधी मिळतील. पाहूया सूर्याचे राशी परिवर्तन कोणत्या राशींचे भाग्य चमकवणार आहे.
सूर्य ग्रह पूर्ण वर्षानंतर स्वतःच्या राशीत सिंह राशीत परतत आहे. 16 ऑगस्ट रोजी तब्बल एक वर्षानंतर सूर्य आपल्या स्वतःच्या राशीत अर्थात सिंह राशीत संक्रमण करणार आहे. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी मानला जातो आणि या राशीत त्याचे संक्रमण मेष आणि सिंह राशीसह अनेक राशींसाठी अनपेक्षित यश मिळवून देणार आहे. बुध आणि शुक्र आधीच सिंह राशीत विराजमान असून आता सूर्य सिंह राशीत संक्रमण करेल. सिंह राशी सूर्य शुक्रासोबत शुक्रादित्य राजयोग तयार करेल आणि बुध ग्रहासोबत बुधादित्य राजयोग तयार होईल. बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग आधीच तयार झालेला आहे. एकाच राशीत एकत्रपणे तीन राजयोग तयार झाल्यामुळे या राशींचे रखडलेले पैसे परत मिळणार आहेत तसेच सूर्यासारखे नशिब चमकणार आहे.
सूर्य राशी संक्रमणाचा मेष राशीवर प्रभाव
मेष राशीच्या लोकांसाठी विशेष करून विद्यार्थी आणि स्पर्धा परिक्षेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. जे जातक नोकरीसाठी परिक्षा देत आहेत किंवा एखाद्या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत त्यांना यश मिळेल. तीनही योगाचा मेष राशीवर सकारात्मक परिणाम पहायला मिळणार आहे. जे लोक रिसर्च करत आहेत किंवा सर्जनशील काम करत आहेत त्यांना हा काळ लाभदायक आहे. सरकारी नोकरी संदर्भात तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा कुठे तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला नक्की यश मिळेल. लव लाइफसाठी हा काळ चांगला आहे. एकूणच तुमची प्रगती दिसून येते आहे फक्त तब्येतीची नीट काळजी घ्या. काही कारणामुळे तब्येत बिघडली तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सूर्य राशी संक्रमणाचा मिथुन राशीवर प्रभाव
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण खूप सकारात्मक असून तुमच्या जीवनाला कलाटणी देणारे असेल. तुमचा उत्साह आणि नेतृत्व क्षमता यांच्या बळावर तुम्ही कठीणातील कठिण प्रसंगाा सहज सामना कराल. संक्रमणादरम्यान सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात भौतिक सुविधा वाढतील आणि तुमच्या जीवनात शुभ प्रभाव राहणार आहे. ऑफिसमध्ये तुम्ही घेतलेले झटपट निर्णय आणि कार्यक्षमतेचे कौतुक केले जाईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि लहान भावांसोबत मतभेद वाढू देऊ नका. धार्मिक तसेच आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. जे लोक खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचा विचार करत होते त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.
सूर्य राशी संक्रमणाचा सिंह राशीवर प्रभाव
सूर्य हा सिंह राशीचा स्वामी मानला जातो. सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण अतिशय शुभ असून तुमची मान-प्रतिष्ठा वाढविणारे आहे. तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा तर मिळेलच त्याचबरोबर सन्मान आणि पुरस्कारही जाहीर होऊ शकतात. या संक्रमणामुळे तुमची अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. केंद्र किंवा राज्य सरकारामुळे तुमची कामे थांबलेली असतील तर ती त्वरीत मार्गी लागणार आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची नवीन निविदा भरायची असल्यास, हे संक्रमण अनुकूल असेल. जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठीही हे संक्रमण खूप फलदायी ठरेल. तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल आणि एक चांगला जीवनसाथीही मिळेल.
सूर्य राशी संक्रमणाचा तुळ राशीवर प्रभाव
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण यश देणारे आहे. तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील जर तुम्हाला एखादा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन करार करायचा असेल तर त्यासाठीही हा काळ अनुकूल राहील. यावेळी काही चांगल्या नोकरीच्या ऑफर तुमच्याकडे येऊ शकतात. तुम्ही हुशारीने तुम्हाला योग्य असणारी आणि लाभ देणारी नोकरी निवडू शकता. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि मोठे भाऊ यांच्याशी मतभेद वाढू देऊ नका. अपत्यप्राप्तीचे सुख मिळेल. नवविवाहित जोडप्यासाठी आनंदाची बातमी आहे. प्रेमविवाहातील अडथळे दूर होणार आहेत.
सूर्य राशी संक्रमणाचा धनु राशीवर प्रभाव
धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचे सिंह राशीतील संक्रमण लाबदायक आणि शुभ प्रभाव देणारे आहे. तुम्ही ज्या रणनीतीने कामाची आखणी केलेली आहे त्याचा सकारात्मक प्रभाव दिसेल. तुमच्या निर्णयामुळे ऑफिसला लाभ होईल त्यामुळे तुमचे कौतुक तसेच मानसन्मानात वाढ होणार आहे. काही कामे अशी आहेत जी होता होता थांबतील पण तुम्ही घाबरु नका किंवा टेन्शन घेऊ नका ती वेळेत पूर्ण होतील. तुमची अध्यात्मात रुची वाढणार आहे. जर तुम्हाला परदेशी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आणि व्हिसासाठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठीही हे संक्रमण अनुकूल असेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल आणि तुम्हाला आयुष्यात भरभरुन यश मिळेल.