विधानसभेच्या २८८ जागा लढवू आणि सरकारही बनवू, भुजबळांच्या नाशिकमध्ये जरांगेंची घोषणा

नाशिक : माता-माऊल्यांसह लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर येऊन आक्रोश करतोय, सत्ताधारी पक्षाचे काय डोळे गेलेत काय? असा आक्रमक सवाल करून विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविणार असल्याची घोषणा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्याचवेळी पुढील सरकार आमचेच असणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. समाज मोठा झाला पाहिजे म्हणून राज्यातील मराठा ताकदीने एकवटले आहेत. भाजपला मतदान करणाऱ्या मराठ्यांनी पण त्यांना लाथ मारली आहे. त्यामुळे ही लाट सोपी नाही. या लाटेत अनेक जण उद्ध्वस्त होतील, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

मराठा आरक्षण जनजागृती व महाविराट शांतता रॅलीसमवेत मनोज जरांगे पाटील मंगळवारी नाशिकमध्ये दाखल झाले. मंत्री छगन भुजबळ यांनी ‘हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवाच’ असे थेट आव्हान दिल्याने मनोज जरांगे यांनीही उट्टे काढले. नाशिकमधील मराठा समाजाने आज माझी कॉलर टाईट केली, या जिल्ह्यावर कुणाचे नाव नाही. मराठा समाजाच्या लाटेत अनेक जण भस्मसात होतील, असा निशाणा त्यांनी भुजबळ यांच्यावर साधला.
Manoj Jarange: रॅलीनंतर नाशकात मनोज जरांगेंची भव्य सभा; छगन भुजबळांना प्रत्त्युत्तर देणार? पाटील आज काय बोलणार?

विधानसभेच्या २८८ जागा लढवू आणि सरकारही बनवू

मराठा आणि कुणही एकच आहेत. सरकारने तत्काळ कायदा पारित करावा. जर सरकारने आमच्या म्हणण्याला किंमत दिली नाही तर येत्या विधानसभेला आम्ही त्यांना घरी पाठवणार आहोत. विधानसभेच्या राज्यातील सर्व २८८ जागा लढवून आम्ही आमचे सरकार बनवू, असे जरांगे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण षडयंत्र रचून मराठा समाजाला टार्गेट करू नये, ते का म्हणून मराठ्यांचा एवढा द्वेष करतात? अशी टीकात्मक विचारणा त्यांनी केली. मराठा-ओबीसी यांच्यादरम्यान दंगल घडविण्याचा फडणवीस-भुजबळ यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला.
पावसात भिजले तरी आता मतं देणार नाही, पवारांना टोला, चंद्रकांतदादा म्हणजे आदिमानव, जरांगेंचा हल्ला

जरांगे यांच्या टार्गेटवर भुजबळ-फडणवीस!

आम्हाला आता पक्ष नको, आम्हाला नेता नको, आमच्या पोराबाळांचं हित हीच आमची जात असल्याचे नाशिकच्या मराठा समाजाने आज दाखवून दिले. नाशिक जिल्हा ही कुणाची खासगी जहागीर नाही. इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा, शेतकऱ्यांचा आणि सगळ्या जातीधर्माच्या लोकांचा हा जिल्हा आहे, अशा शब्दात त्यांनी भुजबळांना लक्ष्य केले. भुजबळ यांनी आरक्षणाला कितीही विरोध केला तरी मराठा समाजाला आरक्षण देऊन जातीला मोठे करण्याचे मी काम करणार म्हणजे करणार, असे आव्हानही जरांगे यांनी दिले.

जो समाजासाठी भांडणार, त्याला आमची साथ

सत्ताधारी पक्षातही मराठा आमदार आहेत, त्यांच्याविषयी विधानसभेला आपली काय रणनीती असेल असा प्रश्न जरांगे यांना विचारल्यावर ते म्हणाले, “जो आमच्या विरोधात बोलणार तो आमचा विरोधक असेल, जो जातीसाठी भांडणार त्याला आमची साथ असेल”

Source link

manoj jarange patilManoj Jarange Patil on Vidhan SabhaManoj Jarange Patil Rally NashikMaratha Reservation Shantata Rally NashikVidhan Sabha Election 2024मनोज जरांगे नाशिक शांतता रॅलीमनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षण नाशिक शांतता रॅलीविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment