काय आहे प्रकरण?
महिलांची अश्लील छायाचित्रे तयार करून व्हायरल करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात कोपरखैरणे पोलिसांनी आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. विवाहितेच्या मैत्रिणीने काही महिन्यांपूर्वी एका लोन अॅपद्वारे कर्ज घेतले होते. त्यानंतर त्या मैत्रिणीला कर्जाची रक्कम भरण्यासाठी वारंवार फोन येत होते. कर्ज न भरल्यास तिची छायाचित्रे तसेच, तिच्या मोबाइलमधील कोणत्याही महिलेची छायाचित्रे मॉर्फ करून त्याची अश्लील छायाचित्रे तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी समोरील व्यक्तींकडून देण्यात येत होती. त्यानंतर सायबरचोरांनी मैत्रिणीच्या मोबाइलमधील घणसोली येथे राहणाऱ्या विवाहितेची माहिती मिळवून तिचे व तिच्या मैत्रिणीची मॉर्फ केलेली अश्लील छायाचित्रे तिला व तिच्या पतीसह इतरांना पाठवून ती व्हायरल केली.
या छायाचित्राच्या खाली विवाहितेच्या मैत्रिणीने कर्ज घेतल्याचे व ती कर्ज भरत नसल्यामुळे तिला कर्जाची रक्कम भरण्याबाबत संदेश पाठवले. सर्व छायाचित्रांमध्ये या विवाहितेचे तसेच, तिच्या मैत्रिणीची मॉर्फ केलेली अश्लील छायाचित्रे व त्याखाली अश्लील संदेश टाकण्यात आल्याचे पाहून विवाहितेला धक्का बसला. सायबरचोरांनी ही छायाचित्रे तिच्या पतीलाही पाठवली होती. त्यानंतर विवाहितेने पतीसह कोपरखैरणे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.