जळगाव शहराचा रस्त्याचा विषय आमदार सुरेश भोळे यांनी डीपी बैठकीत मोठ्या प्रमाणात गाजवला होता. जळगाव शहरामध्ये रस्ते अतिशय खड्डेमय झाले असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्डे बुजवण्यासाठी पावसाळ्यापूर्वी नवीन काम देखील करण्यात आली. मात्र याच कामाचा पावसाळ्यामध्ये बोजवारा उडलेला आहे.
आज कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत असताना म्हणाले, जळगाव शहरातील रस्ते नवीन बनविण्यासाठी आणखी १०० कोटी रुपये दिले जातील. यासाठी शहराचे आ.राजूमामा भोळे यांचा रस्ते सुधारणेचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे, त्याला आता आम्ही मंजुरी देत आहोत, तसेच जळगावात नवीन एमआयडीसीची घोषणा करीत असून त्याद्वारेनवीन रोजगार निर्माण करण्याचा आमच प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी जळगावात आल्यावर घोषणा केली.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आ.राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी शहराच्या रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्यांची प्रगती वेगवान होते. त्यामुळे राज्याच्या चाव्या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याने अजित पवार यांच्याकडे बघून आम्ही १०० कोटी, च्या प्रस्तावाला मंजुरी देत आहोत,असे सीएम शिंदे भरसभेत अजितदादांकडे पाहत म्हणाले. तसेच, जळगावात नवीन एमआयडीसीची घोषणा करून उद्योगमंत्र्याना सांगून आम्ही भगिनींना रोजगार देण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत, असे शिंदे म्हणाले. पारोळा नगरपालिकेचा पाणीपुरवठा योजनांबाबत आ.चिमणराव पाटील यांच्या प्रस्तावासाठी सुद्धा आम्ही जीआर काढलेला आहे अशीही माहिती त्यांनी दिली.
एमआयडीसी होणार की निवडणुकी आधीची घोषणा?
जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून ओळखले जाते. तसेच याच जिल्ह्यात मोठ्या एमआयडीसी होणे गरजेचे आहे. यात मोठमोठ्या कंपन्या जळगाव शहरामध्ये आणल्या जाव्यात यासाठी आतापर्यंत एकही आमदार मंत्र्यांनी मेहनत केलेली नाही अशी जिल्ह्यात चर्चा आहे. जळगाव जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेऊन पुणे नाशिक मुंबई यासह इतर जिल्ह्यामध्ये नोकरीसाठी भटकंती करीत असतात. मात्र जळगाव जिल्ह्यात मोठे उद्योजक नसल्याने जिल्हा हा अन्य जिल्ह्यापेक्षा मागे राहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज एमआयडीसीची घोषणा तर केली खरं, मात्र ही घोषणा निवडणुकीपुरता मर्यादित न राहता याची खरोखर अंमलबजावणी करून या जळगाव शहरात एमआयडीसी आणण्यात यावी अशी जळगावकरांची मागणी आहे.