उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम
पुणे रेल्वे विभागाकडून सातत्याने प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदु दुबे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्याकडून विविध उपक्रम राबवले जातात. प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीमधून उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
विक्रमी उत्पन्न
गेल्या महिन्यात पुणे रेल्वे विभागाला प्रवासी वाहतुकीमधून १३९ कोटी चार लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी जुलैच्या तुलनेत १७ टक्के अधिक आहे. मालवाहतुकीमधून ४० कोटी ७० लाख उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते १६ टक्के अधिक आहे. इतर कोचिंगचे उत्पन्न १० कोटी ४२ लाख आहे. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्के अधिक आहे. विविध महसुलातून एक कोटी ४१ लाख रुपये आणि पार्सल सेवेतून चार कोटी २५ लाख रुपये मिळाले असून, हे गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्के अधिक आहेत.
पुणे ते नागपूरसाठी चार रेल्वे…
पुणे : मध्ये रेल्वे प्रशासनाने पुणे-नागपूर-पुणे या दरम्यान चार एसी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, बुधवार (१४ ऑगस्ट) ते १७ ऑगस्ट दरम्यान या गाड्यात चालवल्या जाणार आहेत. नागपूर-पुणे सुपरफास्ट (रेल्वे क्रमांक ०२१४४) एसी स्पेशल गाडी १४ ऑगस्ट आणि १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून सायंकाळी सात वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे. पुणे-नागपूर सुपरफास्ट (रेल्वे क्रमांक ०२१४३) एसी स्पेशल गाडी १५ ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी पुण्याहून दुपारी चार वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे; तसेच १७ ऑगस्ट रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहोचणार आहे. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव-मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड मार्ग आणि उरुळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.