जळगाव : राज्यात गुन्हेगारीसह हिट अँड रनच्या केसेस देखील वाढत आहे. अशातच जळगावमधून अशीच एक अपघाताची बातमी समोर आली आहे, एका भरधाव कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या महिलेला धडक दिली. या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. जळगाव तालुक्यातील वावडदे ते जळके रस्त्यादरम्यान हा अपघात घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव कारने दुचाकीस्वार आणि पायी जाणाऱ्या महिलेला जोराची धडक दिली. त्यानंतर कार देखील पलटी झाली. या अपघातामध्ये कारमधील तिघे आणि महिला व दुचाकीस्वार असे पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केलं आहे. घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कृष्णा पिंगळे (वय वर्ष २० रा. गाडगेबाबा चौक, जळगाव), मयंक राजेंद्र चौधरी वय २१, रा. गणेशवाडी, जळगाव), आदित्य अनिल बिऱ्हाडे (वय २० वर्ष, रा. हरीविठ्ठल नगर,जळगाव) या तिघांसह जय पाटील (वय २०) आणि लोकेश राजपूत (वय २१, दोन्ही रा. जळगाव) असे पाचजण हे लाल रंगाची कार (एम एच १५ सीडी ८१९४) ने पद्मालय येथे गेले होते. जळगावला परत येत असताना एका वाहनाला कारचा कट लागला. त्यावरून कारमधील चालकाने वाहन थांबवले. मात्र त्या ठिकाणी जमाव जमू लागल्यानंतर कारमधील कृष्णा पिंगळे, मयंक चौधरी, आदित्य बिऱ्हाडे हे तिघेजण घाबरल्याने त्यांनी कार वावडद्याच्या दिशेने भरधाव नेली. त्यानंतर वावडदा येथे ही कार अडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतर या कारनं आणखी एका दुचाकीला आणि महिलेला उडवलं. त्यानंतर कार पलटी झाली. या घटनेत पाच जण जखमी झाले.