वर्सोवा बीचवर भरधाव गाडीने चिरडलं, चेहऱ्यावरुन चाक गेल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू, मित्र जखमी

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईसह राज्यात हिट अँड रनच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत. वर्सोवा बीचवर भरधाव एसयूव्ही जीप चालवून दोघांना चिरडण्यात आल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या अपघातामध्ये ऑटो रिक्षा चालक गणेश यादव याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव हा गंभीर जखमी झाला.

दोघेही वाढत्या उष्म्यामुळे बीचवर झोपण्यासाठी गेले होते. अपघातानंतर पसार झालेला चालक निखिल जावडे (३४) आणि त्याचा मित्र शुभम डोंगरे (३३) यांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली. निखिल हा नागपूरचा, तर शुभम हा ऐरोलीचा रहिवासी आहे.

रिक्षा चालक गणेश यादव आणि कुरिअर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा त्याचा मित्र हे वर्सोवा बीचनजीक असलेल्या सागर कुटीर रहिवासी वसाहतीमध्ये राहतात. झोपडपट्टी आणि दाटीवाटीची वस्ती असल्याने आणि त्यातच पावसाने दडी मारल्याने उकडत असल्याने दोघेही नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री झोपण्यासाठी वर्सोवा बीचवर गेले. दोघेही गाढ झोपेत असताना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव आलेली जीप त्यांच्या अंगावरून गेली.
Local Passenger life saved : मित्रांनो, रुळांवर एक दादा पडलेत, प्लीज उतरुन मदत कराल? मोटरमनची विनंती, प्रवाशांमुळे जीवदान
यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. गणेश तर चेहऱ्यावरून चाक गेल्यामुळे बेशुद्ध पडला होता. बीचवरून येत असलेला आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक या ठिकाणी जमा झाले. गर्दी होत असल्याचे पाहून चालकाने तिथून पळ काढला. नागरिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले असता गणेश याला तपासून मृत घोषित करण्यात आले.
Haridwar Couple Suicide : हातात हात घेत शेवटचा सेल्फी, लोकेशन पाठवून नदीत उडी, सौरभ-मोनाने टोकाचं पाऊल का उचललं?
या अपघाताबाबतची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी अपघातानंतर पळताना जीप चालकाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी या चित्रीकरणाच्या आधारे जीपचा क्रमांक मिळवला. त्याआधारे निखिल जावडे (३४) आणि त्याचा मित्र शुभम डोंगरे (३३) यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी जीप जप्त केली असून ती नागपूरच्या सतीश एस. यांची आहे. त्यांनी ती जावडे आणि डोंगरे यांना कंत्राटावर दिली होती. सोमवारी एका ग्राहकाला सोडल्यानंतर जावडे हा डोंगरेला भेटण्यासाठी मुंबईत आला. सकाळी पावणेसहाच्या सुमारास दोघांनी भरधाव वेगात गाडी चालवली आणि वाहनांसाठी प्रतिबंधित असलेल्या वर्सोवा बीचवर नेली. वर्सोवा पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

Source link

mumbai batmyamumbai crimeMumbai Hit and RunSUV Car run over Rickshaw DriverVersova Apghatअंधेरी रिक्षाचालक अपघात मृत्यूमुंबई अपघातवर्सोवा बीच अपघातवर्सोवा समुद्रकिनारी कारने चिरडलेवर्सोवा हिट अँड रन
Comments (0)
Add Comment