पुणे गणपती मंडळांसाठी मोठी बातमी; यंदा गणेशोत्सवात झगमगत्या लेझर लाईटवर बंदी, नियम मोडल्यास…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकावर लावण्यात येणाऱ्या लेझर बीम लाइटवर पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोणी लेझर बीम लाइट लावल्यास, कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी दिली.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात सोमवारी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तर, मंगळवारी पोलीस आयुक्तालयात शहरातील मानाच्या पाच गणेश मंडळांसह अन्य महत्त्वाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुणे रेल्वे विभागाची छप्परफाड़ कमाई; जुलैत कमावले करोडो रुपये, किती मिळाले उत्पन्न?
गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत ध्वनीक्षेपकांच्या दणदणाटामुळे काही नागरिकांना बहिरेपणाची समस्या उद्भवली आणि काहींना हृदयविकाराचे झटके आल्याच्याही घटना घडल्या होत्या. लेझर बीम लाइटमुळे डोळ्यांना इजा झाल्याचे प्रकार घडले होते. या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांनी आतापासून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ध्वनीक्षेपकांचा मिरवणुकीतील वापर, न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाच्या मर्यादा याबाबत पोलीस ‘डीजे’ व्यावसायिकांशी चर्चा करणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

प्रमुख मंडळांची ढोल-ताशालाच पसंती

गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक बॅण्ड, ढोल-ताशा पथकांचाच समावेश असावा, असा आग्रह मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख मंडळांनी बोलून दाखविला. ध्वनीक्षेपकाच्या अतिरेकी वापराबाबत या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.
मराठवाड्यातील धरणे तळालाच! पुणे, कोकणात परिस्थिती चांगली; राज्यातील धरणांत ६८ टक्के पाणीसाठा

एका मंडळासमोर एकच पथक?

गणेश विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ आटोक्यात आणण्यासाठी मिरवणुकीत प्रत्येक मंडळासमोर लावण्यात येणाऱ्या ढोल-ताशा पथकांची संख्या कमी ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळासमोर एकच ढोल-ताशा पथकाने वादन करावे, असा पोलिसांचा आग्रह आहे.

‘लेझर बीम लाइटमुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न उपस्थित झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाइटच्या वापरावर बंदी घालण्यात येत आहे. तसेच, ध्वनी प्रदूषण रोखण्याबाबतही काही उपाययोजना केल्या जाणार आहेत,’ असे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

Source link

Ganapati festivalGaneshotsav 2024Laser light Banpune ganesh mandalsPune Policeगणपती बाप्पाचा सणगणेशोत्सवाची लगबगगणेशोत्सवासाठीचे नियमपुणे पोलिसांच्या गणेश मंडळांना सूचनालेझर लाईटवर बंदी
Comments (0)
Add Comment