शाळेत न जाता घरी थांबला अन् चिमुकल्याचा दुर्दैवी अंत, एका निर्णयाने कुटुंबाने लेक गमावला

बुलढाणा: सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस आणि वातावरण चिखलमय झाले आहे. त्यात ग्रामीण भागात तर विचाराची सोय नाही अनेक भागात आजही लहानशा झोपडीत म्हणजेच कुडाच्या घरात परिवार वास्तव्य करत असतात त्या अवतीभवती झाडं झुडपं हे त्यांचे कायमचे सोबती. पण, त्या तिथे आपलं आनंद जीवन जगत असतात. पण, त्याच आनंदात विरजण पडलं आणि एक चिमुकल्याचं आयुष्य कायमचं हिरावून घेतलं. या घटनेने साऱ्यांचे डोळे पाणावले.

सर्पदंशाने ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील ढोरवी येथील इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवराज दीपक मुरकुट, असे मृतक मुलाचे नाव आहे.

ढोरवी येथील शिवराज दीपक मुरकुत हा नऊ वर्षाचा बालक जिल्हा परिषद शाळेतील तिसऱ्या वर्गात शिकत होता. दरम्यान, काल १२ ऑगस्ट रोजी त्याला थोडासा ताप आल्याने शाळेत न जाता तो घरीच थांबला होता. सकाळी घरासमोरील अंगणात खेळत असताना अचानक सापाने त्याच्या पायाला दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्याने आपल्या आईला सांगितले. लगेच तिथे जमलेल्या लोकांनी त्या सापाचा शोध घेऊन त्याला तात्काळ मारले आणि त्या मेलेल्या सापाला आणि शिवराजला घेऊन उपचारासाठी मलकापूर पांग्रा येथील खाजगी रुग्णालय गाठले. प्राथमिक उपचारानंतर त्याला बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र, तेथेही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे नेले असता शिवराजची प्राणज्योत मावळली. शिवराज हा शाळेत अत्यंत हुशार होता. त्याच्या दुर्दैवी निधनाने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

जर, चिमुकल्याची तब्येत ठणठणीत असती आणि तो शाळेत गेला असता आणि ती वेळ टळली असती का, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

Source link

buldhana newschild death by snake bitesnake biteबुलढाणा चिमुकल्याला संर्पदंशबुलढाणा बातम्यासर्पदंशाने चिमुकल्याचा मृत्यू
Comments (0)
Add Comment