अजितदादांच्या बंदोबस्तानंतर रात्री झोपले ते उठलेच नाही, धुळ्यात पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

अजय गर्दे, धुळे: पोलिस उपनिरीक्षक डोमदेव गवारे यांचा झोपेतच मृत्यू झाला आहे. शहरातील गोळीबार टेकडी परिसरातील ऑफिसर क्लबमध्ये ही घटना उघडकीस आली. रूमचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले गेले.

शहरातील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात सुमारे आठ महिन्यांपूर्वी पोलिस उपनिरीक्षक डोमदेव मुरलीधर गवारे (वय ५६) हे रुजू झाले होते. अनेक गुन्ह्यांची त्यांनी उकल केली होती. गोळीबार टेकडी परिसरातील ऑफिसर क्लबमध्ये ते राहत होते. त्यांनी रविवारी रात्री गस्त घातली. त्यानंतर सोमवारी पहाटे ६ वाजेपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यामुळे बंदोबस्तावर होते. सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना वरिष्ठांनी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. पण पोलिस उपनिरीक्षक डोमदेव गवारे ऑफिसर क्लबमध्ये आले. रात्री आठ वाजता ते झोपून गेले. सकाळी नऊ वाजेनंतरही ते खोलीच्या बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारे पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे यांनी त्यांना बाहेरून आवाज दिला. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा धक्का देऊन उघडला. या वेळी हा प्रकार उघडकीस आला. पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे,

उपनिरीक्षक गवारे हे पोलीस कर्मचारी नसून तर एक भाऊ म्हणून ते आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वागणूक देत होते, नेहमी पोलीस कर्मचाऱ्यांना एक मदतीचा हात देखील देत होते, कधीही कुणाशी उद्धट बोलले नाही, त्यामुळे गवारे यांच्यासोबत काम करणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, एक चांगला पोलीस उपनिरीक्षक डोमदेव गवारे हे हरपले आहे.. अशी भावना पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आहे…

अजित पवार सोमवारी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० ऑगस्टला साक्री दौऱ्यावर होते. उपनिरीक्षक गवारे हे साक्री येथेही बंदोबस्तासाठी गेले होते. ते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीपासून जवळ असलेल्या राजापूर येथील मूळ रहिवासी होते

Source link

ajit pawardhule police sub-inspector diedpolice deathअजित पवार धुळे दौराझोपतेच पोलिसाचा मृत्यूधुळे बातम्याधुळ्यात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
Comments (0)
Add Comment