स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पदकांची घोषणा, राज्याला मिळाली ५० हून अधिक पदके; पाहा नावांची यादी

मुंबई : पोलीस खात्यातील उल्लेखनीय कार्यासाठी ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील तीन पोलिस अधिका-यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान करण्यात आले. यासह राज्यातील १७ पोलिस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्याना ‘पोलीस शौर्य पदक’ तर ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण ५९ पोलिसांना पदके प्रदान कण्यात आली.

विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’मध्ये राज्याचे चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, अतिरिक्त पोलिस महासंचालक, श्री. राजेंद्र बालाजीराव डहाळे, संचालक, श्री. सतीश राघवीर गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा समावेश आहे.

राज्यातल्या १७ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले. पोलीस शौर्य पदकांमध्ये डॉ. कुणाल शंकर सोनावणे – उप-विभागीय पोलीस अधिकारी, दीपक रंभाजी आवटे – पोलीस उपनिरीक्षक, कै. धनाजी तानाजी होनमाने – पोलीस उपनिरीक्षक (मरणोत्तर), नागेशकुमार बोंड्यालू मदरबोईना – नाईक पोलीस शिपाई, शकील युसुफ शेख – पोलीस शिपाई, विश्वनाथ सामैय्या पेंदाम – पोलीस शिपाई, विवेक मानकू नरोटे – पोलीस शिपाई, मोरेश्वर नामदेव पोटावी – पोलीस शिपाई, कैलाश चुंगा कुलमेथे – पोलीस शिपाई, कोटला बोटू कोरामी – पोलीस शिपाई, कोरके सन्नी वेलादी – पोलीस शिपाई, महादेव विष्णू वानखेडे – पोलीस शिपाई, अनुज मिलिंद तारे (आयपीएस) -अतिरिक्त पोलीस अधीक्षक, राहुल नामदेवराव देव्हाडे – पोलीस उपनिरीक्षक, विजय दादासो सकपाळ – पोलीस उपनिरीक्षक, महेश बोरू मिच्छा – मुख्य शिपाई, समय्या लिंगय्या आसाम – नाईक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.
Dhule News: अजितदादांच्या बंदोबस्तानंतर रात्री झोपले ते उठलेच नाही, धुळ्यात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ राज्यातल्या ३९ पोलिसांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये – दत्तात्रय तुळशीदास शिंदे- उपमहानिरीक्षक, संदीप गजानन दिवाण- उपमहानिरीक्षक, शिवाजी ज्ञानदेव फडतरे- उप-अधीक्षक, संजय मारुती खांदे-अधीक्षक, विनीत जयंत चौधरी-उपअधीक्षक, प्रकाश पांडुरंग गायकवाड-उपनिरीक्षक, सदानंद जनाबा राणे- निरीक्षक, विजय मोहन हातिसकर-पोलीस सहआयुक्त, महेश मोहनराव तराडे-उप अधीक्षक, राजेश रमेश भागवत- निरीक्षक, गजानन कृष्णराव तांदूळकर- उपनिरीक्षक, राजेंद्र तुकाराम पाटील- उपनिरीक्षक, संजय साहो राणे-उपनिरीक्षक, गोविंद दादू शेवाळे-उपनिरीक्षक, मधुकर पोछा नैताम- उपनिरीक्षक, अशोक बापू होनमाने- निरीक्षक, शशिकांत शंकर तटकरे-उपनिरीक्षक,अक्षयवारनाथ जोखुराम शुक्ला-उपनिरीक्षक,शिवाजी गोविंद जुंदरे- उपनिरीक्षक, सुनील लयाप्पा हांडे- सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश मोतीराम देशमुख-उपनिरीक्षक, दत्तू रामनाथ खुळे- सहाय्यक उपनिरीक्षक, रामदास नागेश पालशेतकर- निरीक्षक (पीए), देविदास श्रावण वाघ-सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश शंकर वाघमारे-सहाय्यक उपनिरीक्षक, संजय दयाराम पाटील- सहाय्यक उपनिरीक्षक, मोनिका सॅम्युअल थॉमस- सहाय्यक उपनिरीक्षक,बंडू बाबुराव ठाकरे- मुख्य शिपाई, गणेश मानाजी भामरे- मुख्य शिपाई,अरुण निवृत्ती खैरे- मुख्य शिपाई, दीपक नारायण टिल्लू- मुख्य शिपाई, राजेश तुकारामजी पैदलवार- मुख्य शिपाई, श्रीकृष्ण गंगाराम हिरपूरकर-सहाय्यक कमांडंट, राजू संपत सुर्वे-निरीक्षक,संजीव दत्तात्रेय धुमाळ- निरीक्षक, अनिल उत्तम काळे-सहाय्यक उपनिरीक्षक, मोहन रामचंद्र निखारे- सहाय्यक उपनिरीक्षक, द्वारकादास महादेवराव भांगे-सहाय्यक उपनिरीक्षक, अमितकुमार माताप्रसाद पांडे- उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

तर यासह केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यंदा ५९ जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ६ अग्निशमन जवानांचा समावेश आहे. संतोष श्रीधर वॉरिक, मुख्य अग्निशमन अधिकारी यांना ‘विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीं पदक’ तर पाच जवानांना ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक’ प्रदान करण्यात आले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- अग्निसेवा पदक
श्री किशोर ज्ञानदेव घाडीगावकर, विभागीय अग्निशमन अधिकारी, श्री अनंत भिवाजी धोत्रे, उप अधिकारी, श्री मोहन वासुदेव तोस्कर, आघाडीचे फायरमन, श्री मुकेश केशव काटे, लीडिंग फायरमन आणि श्री किरण रजनीकांत हत्याल, अग्निशमन अधिकारी यांचा समावेश आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम)- नागरी संरक्षण पदक अशोक बोवाजी ओलंबा, हवालदार यांना प्रदान करण्यात आले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- )- नागरी संरक्षण पदक
श्री नितीन भालचंद्र वयचल, प्राचार्य, शिवाजी पांडुरंग जाधव, जेलर ग्रुप-1, श्री दीपक सूर्याजी सावंत, सुभेदार आणि श्री जनार्दन गोविंद वाघ, हवालदार यांचा समावेश आहे.

Source link

fire brigade awardshome ministrypolice department awardअग्निशामक दलपोलीस खातेपोलीस पदकशौर्य पदकस्वातंत्र्यदिन
Comments (0)
Add Comment