लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही खात्यात आले नाही? यादीत तुमचे नाव नाही ना? जाणून घ्या मोठी अपडेट

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास आजपासून सुरुवात होत आहे. यातच आत्तापर्यंत ज्या लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अजूनही अर्ज केला नाही अशा लाभार्थ्यांसाठी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

अदिती तटकरे म्हणाल्या कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत हि अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. या योजनेचा लाभ ३१ ऑगस्ट नंतर पात्र लाभार्थ्यानाही मिळणार आहे. आत्तापर्यंत या योजनेसाठी १ कोटी ३५ लाख महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यात सुरुवात झाली आहे. ज्यांचे बँक खाते आधारकार्डशी लिंक नाहीत, त्यांची खाती लिंक करून झाल्या नंतर बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.

Vinesh Phogat Next Step: विनेशला रौप्यपदकासाठी अजून एक पर्याय खुला, आता कुठे अपील करू शकते जाणून घ्या…

योजनेचे पैसे कोणत्या बँक अकाउंट मध्ये येणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्ज केलेल्या बऱ्याच जणांकडे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट आहेत परंतु कोणत्या बँक खात्यात आपली रक्कम जमा होणार आहे याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू डीबीटीमार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक अकाऊंटला आधारकार्ड लिंक करता येते.

– बँक खाते जाणून घ्या साठी या संकेतस्थळावर जा.
– https://myaadhaar.uidai.gov.in/ यात तुमचा १२ अंकी मोबाईल नंबर टाका आणि लॉगिन करा.
– त्यानंतर आधार क्रमांक टाकल्याने तुमच्या मोबाइल नंबर वर ओटीपी येईल तो टाकल्यानंतर त्यावर Bank Seeding Status असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
– यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील आणि बँकेचे नाव दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते दिसेल.
– आधार कार्ड ज्या बँक अकाउंट ला लिंक आहे त्या बँक खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे जमा होतील.

राज्य सरकारने काही दिवासांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. तेव्हापासून त्यात अनेक बदल देखील करण्यात आले आहेत.

Source link

mukhyamantri ladki bahin yojanamukhyamantri ladki bahin yojana first installmentआदिती तटकरेमहिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
Comments (0)
Add Comment