यावरच आता विरोधकांची टीका होवू लागली आहे. संजय राऊत ट्वीट करत म्हणाले, आजचा विनोद…… एक बाई ओढ्यावर कपडे धुवून परत येताना घसरून खाली पडली….मागे फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजीत पवार होते… त्यांनी बाईला उठायला मदत केली… बाईने त्यांना धन्यवाद दिले…. फडणवीस म्हणाले:
माझ्या लाडक्या बहिणी,आम्हाला ओळखले का?मी फडणवीस, हे एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार, आम्ही तुम्हाला उठायला मदत केली… २०२४ मधे आम्हालाच मत देणार ना??”बाई हसल्या आणि म्हणाल्या,”लाडक्या भावा,मी पाठीवर पडले… डोक्यावर नाही.” अशी राऊतांनी टीका केली आहे.
तर खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेला फसवी सांगितले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपयश आले. त्यामुळेच राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आहे. ही फसवी योजना निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असे सुळे म्हणाल्या.
लाडक्या बहीणीसाठी सरकारची पुन्हा घोषणा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास आजपासून सुरुवात होत आहे. यातच आत्तापर्यंत ज्या लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अजूनही अर्ज केला नाही अशा लाभार्थ्यांसाठी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.अदिती तटकरे म्हणाल्या कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत हि अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. या योजनेचा लाभ ३१ ऑगस्ट नंतर पात्र लाभार्थ्यानाही मिळणार आहे.