२. महिनाभरापूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेस पक्षात प्रवेश करणार, तुमसर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांकडे राज्य व केंद्र सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणावरून पटले राजीनामा, आता महाविकास आघाडीचा ‘हात’
३. वर्सोवा बीचवर भरधाव एसयूव्ही जीप चालवून दोघांना चिरडलं, मंगळवारी पहाटे घटना, अपघातामध्ये रिक्षा चालक गणेश यादव याच्या चेहऱ्यावरुन चाक गेल्याने मृत्यू, तर त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव गंभीर जखमी
४. सिंधुदुर्गामध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना, कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील तरुण वसंत उर्फ सागर भगे याला विद्युत तारांच्या जाळ्यात अडकवून शॉक दिला, हत्या प्रकरणी पत्नीसह सासू सासऱ्यांवर कारवाई, वाचा नेमकं काय घडलं
५. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे स्टेशन ते निगडी मार्गावर ‘रातराणी बस’ सुविधा सुरु, पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथून पिंपरी-चिंचवडला रात्री-अपरात्री जाणाऱ्या प्रवाशांसाठी फायदा
६. गुजरातच्या सरकारी शाळांमधील शिक्षक बऱ्याच दिवसांपासून गैरहजर असल्याच्या तक्रारी, ९० दिवसांमध्ये सर्व शिक्षकांच्या हजेरीच्या माहितीतून अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा, राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ३१ शिक्षक बेकायदेशीरपणे दीर्घ काळापासून रजेवर, तर ३२ शिक्षक परदेशी असल्याची माहिती
७. मला टॅक्स जवळजवळ शून्यावर आणायचा आहे, मात्र भारतासमोर गंभीर आव्हानं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची खंत, आव्हानांवर मात करायची आहे, महसूल वाढवण्यासाठी कर, लोकांना त्रास देण्यासाठी नाही, सीतारमण यांचं स्पष्टीकरण
८. सचिन तेंडुलकर आणि रतन टाटा यांची FirstCry च्या आयपीओ लिस्टिंगच्या माध्यमातून मोठी कमाई, टाटांची गुंतवणूक पाच पटीने वाढली, तर सचिन तेंडुलकरला ४० टक्के परतावा, पुण्यातील ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड कंपनी FirstCry या ब्रँडअंतर्गत लहान मुलांचे कपडे आणि उत्पादनाची ऑनलाईन विक्री
९. बॉलिवूडमधील सलीम-जावेद या सुपरहिट जोडीवर आधारित ‘अँग्री यंग मॅन’ डॉक्युमेंट्री सीरिजचा ट्रेलर रिलीज, सलमान खानकडून मनोज कुमारवर अनेक आरोप, ‘क्रांती’ चित्रपटाच्या लेखनाचे क्रेडिट हिसकावल्याचा खळबळजनक दावा,
१०. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याच्याकडून पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत चिंता व्यक्त, जेतेपद राखू शकेल की नाही याबाबत साशंक, सुरक्षेत काही त्रुटी राहिल्यास पाकिस्तान मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी गमवण्याचीही भीती