मुख्यमंत्रिपदाचा शब्द, ठाकरे अन् शिवसेना; राज्यात तोच खेळ पुन्हा, पडद्याआड घडतंय काय?

मुंबई: मागील विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेला बहुमत मिळालं. पण मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना, भाजपची युती तुटली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करत राज्यात सरकार आणलं आणि सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला हात चोळत बसावं लागलं. पण अडीच वर्षांनंतर भाजपनं एकनाथ शिंदेंना सोबत घेत सरकार स्थापन केलं. विधानसभा निवडणुकीआधी अमित शहांनी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता, याचा उल्लेख ठाकरेंनी अनेकदा केला.

आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे, शिवसेना आणि मुख्यमंत्रिपदाचा शब्दाची चर्चा आहे. पण अमित शहांची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वानं घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्त्व करणाऱ्या उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात यावं, अशी शिवसेना उबाठाची मागणी आहे. पण ती काँग्रेस, शरद पवारांनी फेटाळली आहे.
Maharashtra Politics: निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीचे ३ प्लान; राज, दादा, वंचित, जरांगेंची मदत घेणार; काय ठरतंय?
राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आल्यास त्याचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करतील असा समझोता आघाडीतील सगळ्या पक्षांमध्ये व्हावा, अशी मागणी शिवसेना उबाठाकडून करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्रिपदाबद्दल शिवसेना उबाठाला शब्द हवा आहे. याबद्दल महाविकास आघाडीत अंतर्गत सामंजस्य असावं, अशी ठाकरेसेनेची भूमिका आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा ठाकरे असतील असा मेसेज काँग्रेस, शरद पवार गटाच्या नेत्यांना देण्यात यावा, अशी त्यांची इच्छा आहे,’ असं महाविकास आघाडीतील बड्या नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.
Maharashtra Politics: शिंदे ‘मी पुन्हा येईन’ म्हणेनात; फडणवीस, दादाही बोलेनात; मविआ CMपदाचा चेहरा देईना; कारण काय?
उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा एकमतानं घोषित करावा आणि निवडणूक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करावं, असं ठाकरे म्हणाले होते.

काँग्रेस, शरद पवार गट ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या भूमिकेशी सहमत नाहीत. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणूक जिंकल्यानंतर घेऊ, अशी दोन्ही पक्षांची भूमिका आहे. काँग्रेस मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कधीही आधीच जाहीर करत नाही. त्याबद्दलचा निर्णय निवडणूक निकालानंतर घेतला जातो, असं ठाकरेंना सांगण्यात आलं आहे.

Source link

maha vikas aghadiMaharashtra politicsSharad PawarUddhav Thackerayuddhav thackeray cmउद्धव ठाकरेउद्धव ठाकरे मुख्यमंत्रीकाँग्रेसमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment