लाडकं लेकरु योजना आणा, आम्ही काय घोडं मारलंय? स्वातंत्र्यदिनी भुऱ्याचं भन्नाट भाषण

संजय आहेर, जालना : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांचे पैसेही लाडक्या बहि‍णींना मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण असताना सोशल मीडियावर पुन्हा कार्तिक वजीर उर्फ भुऱ्याचे एक भाषण तुफान व्हायरल होत आहे. देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भुऱ्यानेही आपल्या शाळेत त्याच्या खास शैलीत स्वातंत्र्यदिनाचे भाषण केले. या भाषणात भुऱ्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे लहान मुलांसाठीही राज्य सरकारने योजना सुरु करावी, अशी गमतीशीर मागणी केली. त्यामुळे हे भाषण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजनांची घोषणा केली जात आहे. यामध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या दोन योजना चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यापैकी लाडका भाऊ योजनेचा दाखला भुऱ्याने आपल्या भाषणात दिला.
Uddhav Thackeray: CMपदाबद्दल निर्णय नाही, पण काँग्रेसकडून ठाकरेंना महत्त्वाचा प्रस्ताव; मोठी जबाबदारी दिली

तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण आमच्यासारख्या छोट्या पोरांना खरंच स्वातंत्र्य आहे का? कोणीही येतं आणि आमच्यासारख्या पोरांना कामं सांगतं, घरातील सगळी बारीकसारीक कामं आम्ही करतो. रानातल्या कामाला आम्हाला नेतात, सुट्टी असली की घरचं आणि रानातलं अशी दोन्ही कामं करावी लागतात. आम्हाला स्वातंत्र्य नावाची काही गोष्ट आहे की नाही? मोठी लोकं आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत. आता सरकार मोठ्या पोरांना पगार सुरु करणार आहे. आधीच त्यांना काही कामधंदा नाही, आता ते दिवसभर मोबाईल चिवडत बसतील, सरकारने पगार सुरु केल्यावर मोछं पोरं आता रानातलं कामही करणार नाही. मग आमच्यासारख्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलंय? आम्हालाही पगार सुरु झाला पाहिजे. आम्हालाही खर्चापाण्याला पैसे लागतात. त्यासाठी सरकारने लाडकं लेकरु योजना आणून आम्हाला पगार सुरु करावा, असे भुऱ्याने म्हटलं आहे.

Source link

bhuryabhurya funny speechcm ladki bahin yojanaIndependence Day 2024jalna newskartik wazirladka bhau yojanaकार्तिक वजीर भाषणजालना मराठी बातम्याभुऱ्या
Comments (0)
Add Comment