VIDEO: मुख्यमंत्र्यांनी दोरी खेचली, पण झेंडा फडकेना; बराच वेळ प्रयत्न करुनही जमेना, अखेर…

मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी १५ ऑगस्टच्या निमित्तानं ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एक वेगळाच पेच निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. झेंडा असा बांधण्यात आला होता की दोरी खेचल्यानंतरही झेंड्याला बांधण्यात आलेली गाठ सुटत नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोरी अनेकदा खेचल्यानंतरही झेंडा फडकत नव्हता. जवळपास ३० सेकंद मुख्यमंत्री दोरी खेचत होते. पण झेंडा काही केल्या फडकत नव्हता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झेंडा फडकवण्यासाठी बरेच प्रयत्न करत होते. त्यांनी अनेकदा दोरी खेचली. पण झेंडा काही केल्या फडकत नव्हता. मग तिथे उपस्थित असलेला पोलीस दलातील एक कर्मचारी पुढे सरसावला. त्यानं खांबाला असलेली गाठ काहीशी सैल केली. मुख्यमंत्र्यांच्या हातात असलेली दोरी जोरात खेचली. त्यानंतर झेंड्याला बांधलेली गाठ सुटली आणि तिरंगा ध्वज फडकू लागला. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी ध्वजाला मानवंदना दिली आणि राष्ट्रगीत सुरु झालं.
Uddhav Thackeray: CMपदाबद्दल निर्णय नाही, पण काँग्रेसकडून ठाकरेंना महत्त्वाचा प्रस्ताव; मोठी जबाबदारी दिली
मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण करताना मुख्यमंत्र्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. जवळपास ३० सेकंद झेंडा फडकलाच नाही. मुख्यमंत्री वारंवार दोरी खेचत होते. पण बऱ्याच प्रयत्नांनंतरही त्यांना झेंडा फडकवणं जमलं नव्हतं.
Eknath Shinde Ajit Pawar: अर्थ विभागानं असे प्रस्ताव का मंजूर करायचे? दादांचा सवाल; CM शिंदेंसोबत शाब्दिक चकमक
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘देशाच्या सर्व नागरिकांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला, ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या सगळ्यांना मी नमन करतो,’ अशा भावना शिंदेंनी व्यक्त केल्या.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कालच पहिला हफ्ता मिळाला. लाखो महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा झाले. यापुढे दर महिन्याला गरीब महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अधिक माहिती दिली. ‘लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत १.५ कोटी महिलांनी अर्ज भरला आहे. तीन लाख महिलांच्या खात्यात ९९० कोटी रुपये जमा झाले आहेत. विरोधक योजनेवर टीका करत आहेत. आमचं सरकार लोकांना देणारं आहे. आधीच सरकार घेणारं होतं,’ असा टोला त्यांनी लगावला.

Source link

eknath shinde 15th augusteknath shinde flag hoistingMaharashtra politicsshiv senaएकनाथ शिंदे ध्वजवंदनएकनाथ शिंदे ध्वजारोहणएकनाथ शिंदे न्यूजएकनाथ शिंदे स्वातंत्र्य दिनमहाराष्ट्र राजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment