Ajit Pawar & Baramati: बारामतीसाठी अजितदादांनी जय पवारांना सॉफ्ट कॉर्नर तर दिला, पण बारामतीकरांच्या मनात काय…?

बारामती (दीपक पडकर) : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना जय पवार यांच्या विषयी जर कार्यकर्त्यांची व जनतेची इच्छा असेल तर जय पवारांचा विचार करू असे सांगून महाराष्ट्राला धक्का दिला आहे. पण त्यापेक्षा सर्वात जास्त धक्का बारामतीकरांना बसला आहे. कारण बारामतीकरांना मात्र अजितदादा विधानसभेसाठी हवेत. जर अजित पवार नसतील तर…?

या समीकरणांची सुरुवात होते, ती बारामती लोकसभेच्या निवडणुकीपासून..! बारामती मध्ये अजित पवारांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणली. ती पूर्ण करत देखील आणली आहेत. मात्र बारामतीकरांनी लोकसभेच्या निवडणुकीत वेगळाच कौल दिला. खुद्द अजित पवारांचा प्रभाव असलेल्या बालेकिल्ल्यात म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघात तब्बल 48 हजार मतांचे मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळालं. त्याहीपेक्षा आणखी गंभीर बाब म्हणजे ज्या बारामती शहरामध्ये अजित पवारांनी गेल्या दहा ते वीस वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणला, मोठ्या प्रमाणावर रस्ते इमारती आणि सुशभीकरणाची कामे केली, त्याच बारामतीकरांनी मतांचे मताधिक्य सुप्रिया सुळेंच्या पारड्यात टाकले.
कर्जतमध्ये झळकले ‘सुपारीबाज’ फलक, काँग्रेसचे उत्तर तर मनसेने घेतले अंगावर; पुढील अपडेट १६ ऑगस्टला…

आता परिस्थिती विधानसभेची आहे. विरोधक म्हणतात.. वातावरण अजून निवळलेलेच नाही. अजून ही शरद पवार सांगतील तेच घडेल, असे विरोधी पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सांगू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार बऱ्यापैकी ठरलेला आहे. त्याची घोषणा झाली नसली, तरी युगेंद्र पवार हेच उमेदवार असतील, असे आता स्पष्टपणे बोलले जाऊ लागले आहे. आणि युगेंद्र पवार देखील त्या दृष्टीने तयारी करताना दिसत आहेत. त्यामुळे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत बारामतीत होणार असे बोलले जाऊ लागले आहे. मात्र आता अजित पवारांनीच खुद्द त्यामध्ये मिठाचा खडा टाकला आहे.
शेख हसीना यांच्यामुळे भारताचे टेन्शन वाढले; PM मोदींसमोर मोठे राजकीय आव्हान, २०१३ साली दोन्ही देशात पाहा काय झाले होते

आज अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर जय पवार यांचा देखील विधानसभेसाठी विचार केला जाऊ शकतो. असे संकेत देऊन बारामतीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका बाजूला आता जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होईल अशी चर्चा, कार्यकर्ते व पदाधिकारी करू लागले असतानाच या दोघांची तुलना केली जाऊ लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र इथं अजित पवारच हवेत असे म्हणू लागले आहेत.

तसे पाहायला गेले, तर गेल्या काही दिवसांपासून विशेषता बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारापासून जय पवार हे बारामती सक्रिय होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बारामतीत कुस्तीचे मैदान देखील भरवले आणि त्याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी त्यांनी दुचाकीवर कार्यकर्त्यांना घेऊन बारामतीतील गावांचा दौरा देखील केला. कार्यकर्त्यांना वाढते जय पवार यांनी बारामती सक्रिय व्हावे, विधानसभेच्या बाबतीत मात्र कार्यकर्त्यांना इथे अजित दादाच हवेत.

आता येणाऱ्या काळात राजकारण काय वळण घेते ते पाहणे महत्वाचे ठरेल, परंतु लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत जनसन्मान मेळावा घेतला, त्या जनसन्मान मेळाव्यापूर्वी अशी एक चर्चा होती की, अजित पवार हे जय पवार यांचे लॉन्चिंग करतील. अर्थात तशा दृष्टीने अजित पवार यांची वाक्य देखील त्यांच्या भाषणात आलीसुद्धा; मला राज्यभर फिरावयाचे आहे. त्यामुळे इथून मोकळे करा. अशा स्वरूपाचे वक्तव्य अजित पवार यांच्या तोंडी आले देखील, मात्र त्यांनी जय पवार यांचा उल्लेख केला नाही. मात्र त्याची चर्चा त्यानंतरही झाली. आता पुन्हा एकदा खुद्द अजित पवार यांनीच या संदर्भात वक्तव्य केल्याने जय पवार यांची चर्चा सुरू झाली आहे.

दोन सख्ख्या चुलत भावांची स्पर्धा…

एकंदरीत खरोखरच बारामतीत राष्ट्रवादीच्या वतीने जय पवार यांना रिंगणात उतरवले तर दोन युवा नेत्यांची व दोन सख्ख्या चुलत भावांची स्पर्धा बारामतीत होईल आणि नवे युवा पर्व बारामती विधानसभा मतदारसंघात सुरू होईल, परंतु ते बारामतीकरांना कितपत रुचेल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

baramati assembly ajit pawarBaramati Assembly constituency newsअजित पवारजय पवारबारामतीबारामती विधानसभा मतदारसंघयुगेंद्र पवारसुप्रिया सुळे
Comments (0)
Add Comment