स्वातंत्र्य दिनाला १००हून अधिक किलोची जिलेबी फस्त करणारे शहर; गोड पदार्थ एवढा खातात की…

कोल्हापूर(नयन यादवाड) : एरवी वर्षभर तांबडा पांढरा आणि झणझणीत मिसळ वर ताव मारणारे कोल्हापूरकर वर्षातले दोनच म्हणजे स्वतंत्र दिनआणि प्रजासत्ताक दिना दिवशी गोड पदार्थ एवढा खातात की साधारण 100 हून अधिक किलो जिलेबी ते फस्त करतात.कोल्हापूरकर ह्या दिवशी सकाळी उठून झेंडावंदन करून घरी परतत असताना आठवणीने जिलेबी घरी घेऊनच जातात. सकाळपासूनच जिलेबी खाऊन तोंड गोड करून कोल्हापुरात स्वातंत्र्य दिन अन् प्रजासत्ताक दिन एखादा मोठा सण म्हणूनच साजरा करतात. सकाळी नेलेली जिलेबी संपली तर पुन्हा दुपारी एक खेप जीलेबीचा स्टॉलवर टाकून ज्यादा जिलेबी आणली जाते. जोपर्यंत दिवस संपत नाही तोपर्यंत ही जिलेबी खाल्ली जाते. आजपर्यंत आपण तेलातले तुपातले, नारंगी, पिवळा, हिरवा रंगाचे जिलेबी खाल्ले असतील मात्र यंदा पहिल्यांदाच कोल्हापुरात सेंद्रिय गुळाच्या जिलेब्या देखील तयार करण्यात आले आहेत.

स्टॉलच्या बाहेर लांबच लांब रांगा

कोल्हापूरकरांना तांबडा,पांढरा नंतर सर्वाधिक जीव की प्राण असेल तर ते म्हणजे जिलेबी गरमागरम, कुरकुरीत अन् साखरेच्या पाकात मुरलेली जिलेबी कोल्हापूरकर फक्त प्रजासत्ताक दिनी अन् स्वातंत्र्यदिनी खातात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कोल्हापूरकरांनी जिलेबी खरेदी करण्यासाठी स्टॉलच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. कोल्हापुरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला स्टॉलच स्टॉल तुम्हाला दिसू लागतात… ह्या स्टॉलवर दिवस उजाडण्या आधीपासून ते त्या दिवशी रात्रीपर्यंत किलो किलोने जिलेबी खरेदी केली जाते.
Special Story: डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य वर्षानंतर ही जगण्यासाठी सुरू असलेली गरीबाची धडपड

कोल्हापूरात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त जिलेबी खाऊन आनंद व्यक्त केला जातो. वर्षातील हे दोन्ही दिवस इतर सणाप्रमाणेच मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. घरोघरी विशेष जेवणाचा बेत असतोच पण त्या सोबतच घराघरात आजच्या दिवशी किलो किलोने जिलेबी फस्त केली जाते. मिठाई वाले भल्या पहाटे म्हणजे 2 -3 वाजल्यापासूनच गरमागरम जिलेबी तयार करण्यास सुरुवात करतात.
Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहिण योजनबाबत महत्वाचा निर्णय; राज्य सरकारने मंजूर केले आणखी १९९ कोटी, जाणून घ्या मोठी अपडेट

पहील्यांदाच सेंद्रिय गुळाची जिलेबी ग्राहकांना उपलब्ध

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक मिठाई दुकानात रस्त्याच्या कडेला स्टॉल मारून कोल्हापुरातील मिठाईवाले जिलेबी बनविण्यास अधिक कारागीर यावेळी बोलवतात.. मोठ मोठ्या थाळ्या भरून इथे जिलेबी तयार केली जाते. गरमागरम अन् कुरकुरीत जिलेबीस ग्राहक अधिक पसंती देतात. कोल्हापुरात गल्लोगल्ली असलेल्या जिलेबी स्टॉलवर गर्दी असतेच महानगरपालिकेच्या इमारती समोरच माळकर बंधू, माधुरी बेकरी या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाला अधिक गर्दी जिलेबी खरेदीसाठी होते. मात्र यंदा सेंद्रिय गुळाच्या जिलेब्यांकडे कोल्हापूरकरांनी आपला मोर्चा वळवला होता.

जिलेबी मध्ये यावर्षी पहिल्यांदाच गुळाचा गोडवा पाहायला मिळत आहे. नेहमीच साखरेच्या पाकामध्ये जिलेबी बनवली जाते मात्र, यावर्षी काही प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येत सेंद्रिय गुळाची जिलेबी ग्राहकांना उपलब्ध करून दिली. राजू करंबे, यशवंत पाटील, गजानन करंबे,कृष्णात पाटील आणि अशोक पाटील यांना ही कल्पना सुचली. मधुमेह असणाऱ्यांना देखील ही जिलेबी खाता येते त्यामुळे मधुमेह असणारी जी लोकं व्यक्ती जिलेबी पासून दूर पळायचे ते आता सेंद्रिय गुळाची जिलेबी घेण्यासाठी स्टॉलच्या रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. कोल्हापूर सह महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या जिलेबीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

Source link

kolhapur and independence daykolhapur city eat more than 100 kg of jalebikolhapur latest newsKolhapur News Todayकोल्हापूर जिलेबीजिलेबीस्वातंत्र्य दिन
Comments (0)
Add Comment