डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटलं, भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच अंत

पंकज गाडेकर, वाशिम : राज्यात अपघाताचं तसेच हिट अँड रनचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. असाच एक भीषण अपघात वाशिममध्ये झाला आहे. वाहनचालकाला झोप लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून उभ्या आयशरला जोरदार धडक दिलेल्या अपघातात बाप लेक जागीच ठार तर पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील वनोजा इंटरचेंजजवळ दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पराग सोनार (वय ४५), पत्नी दिपाली सोनार (वय ४०), मुलगा अनिस सोनार (वय ९ वर्ष) आणि मुलगी रुझुल सोनार सर्व राहणार वाशी, मुंबई हे चारचाकी वाहन क्रमांक एम.एच ४३ बीके ६२८४ ने नागपूरला जात असताना चालक पराग सोनार यांना अचानक डुलकी आली. झोप लागल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि रस्त्यात उभ्या असलेल्या नादुरुस्त आयशर वाहन क्रमांक एम.एच ०४ एचडी ९९८१ला मागून जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनचालक पराग सोनार आणि त्यांचा ९ वर्षीय मुलगा अनिस सोनार या बाप लेकांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारार्थ दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे.
Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तब्बल इतक्या कोटींचा खर्च, एसटी स्टँड, मेट्रोत होणार प्रसिद्धी

अपघात एवढा भीषण होता की, मागून धडक लागलेली कार आयशरमध्ये घुसली होती. त्यामुळे दोन्ही मृतकांना बाहेर काढण्यासाठी कारला कटरने कापावे लागले. यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र अमानीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन दांदडे, पोलीस उपनिरीक्षक राठोड हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सोबत मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करत आहेत. देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात बाप लेकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Source link

accident newswashim accident newswashim car eicher accidentwashim samriddhi highway accidentअपघात बातम्यावाशिम अपघात बातम्यावाशिम कार आयशर अपघातवाशिम समृद्धी महामार्ग अपघात
Comments (0)
Add Comment