सोशल मीडियावर ओळख, गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, वारंवार अत्याचार; अन्…

अमरावती : सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणीला आपली खरी ओळख लपवत प्रेमजाळ्यात फसवलं. तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना कोतवाली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी उशिरा रात्री दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.अमजद खान पठाण आणि युनूस खान पठाण दोघेही रा. उदगीर, लातूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित ३२ वर्षीय तरुणी आणि अमजद खान यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यावेळी अमजद खानने तरुणीला स्वतःचे नाव सचिन इंदोरे असे सांगितले. त्यांच्यात बोलचाल वाढल्यानंतर तो अमरावतीत आला. त्याने तरुणीला प्रेमजाळ्यात फासून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तरुणीला शेगाव व नांदेड येथे बोलावून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीने लग्नाची मागणी केल्यावर त्याने आपण मंदिरात लग्न करु, असे सांगितले. त्यानंतर त्याने तरुणीसोबत शहरातील एका मंदिरात हार घालून लग्न केले. दरम्यान, आपण मर्चन्ट नेव्हीमध्ये नोकरीवर आहे, असे सांगून तो निघून गेला.
Assembly Elections: विधानसभा निवडणुकांचे पडघम, केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, किती वाजता घोषणा?

लग्नानंतर तरुणी ही अमरावतीत भाड्याने खोली करुन राहत होती. दरम्यान, लग्नानंतर काही दिवसांनंतर तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्याचे खरे नाव अमजद खान असल्याचे माहिती झाले. मात्र, त्यावेळी त्याने तरुणीला मी सचिन इंदोरेच आहे, असे पटवून दिले. दरम्यान काही दिवसांनी अमजद खानचे दुसरे लग्नसुद्धा झाले आहे, असे तरुणीला कळले. त्यामुळे तरुणीने अमजदचा भाऊ युनूस खान याचा मोबाइल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. त्यावर त्याने तिला धमकी दिली. याबाबत कळल्यावर अमजद खाने तिला चर्चेसाठी मुंबईला बोलाविले. तेथे त्याने तिच्या मोबाइलमधील सर्व फोटो, व्हिडीओ व चॅट डिलीट केली. तसेच तिला मारहाण करुन धमकी दिली. त्यामुळे पीडित तरुणीने रात्री कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली.

Source link

Amravati Crime Newsamravati girl abusedAmravati policemaharashtra crime newsअमरावती क्राइम बातम्याअमरावती तरुणीवर अत्याचारअमरावती पोलीसमहाराष्ट्र क्राइम बातम्या
Comments (0)
Add Comment