विधानसभा निवडणुकांचे आज बिगुल, राज ठाकरेंवर सिनेमाची चाहूल, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी ३ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद, जम्मू-काश्मीर निवडणुका जाहीर होणार असल्याची माहिती, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखाही घोषित होण्याती शक्यता, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका, महाराष्ट्र विधानसभेच्या घोषणेची शक्यता कमी

२. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दोन हप्ते मिळण्यास सुरुवात, प्रसिद्धीसाठीही राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांची तरतूद, १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार ४३६ रुपयांच्या निधीला महिला व बालविकास विभागाची मान्यता

३. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे गटप्रमुख निलेश ठोंबरे यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासमोर हातातलं शिवबंधन सोडलं, ठाकरे गटाला रामराम ठोकून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती, इथे वाचा सविस्तर

४. पावसाने गेल्या आठवड्यात दिलेली ओढ येत्या आठवड्यातही कायम राहणार, कोकण विभागात मोठ्या फरकाने सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होईल, हवामान विभागाच अंदाज, येत्या दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार २२ ऑगस्टपर्यंत पावसाचा खंड कायम राहण्याची चिन्हं, तापमानातही वाढ होऊन मुंबई आणि परिसरात उकाड्याचा स्तर कायम राहण्याचा अंदाज

५. महिलेचा मृतदेह झाडावर लटकलेला, तर मुलाचा मृतदेह नदीत, नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातील सरी गावाच्या शिवारातील घाटात घटना, विवाहितेच्या माहेरच्या मंडळींना घातपाताचा संशय, मायलेकाचा मृतदेह दोन दिवसांपासून मिठात पुरुन ठेवला, आरोपींचा तपास सुरु

६. कोलकात्यातील आर. जी. कर सरकारी रुग्णालयामधील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी सीबीआयचा रुग्णालयातील डॉक्टरांकडे मोर्चा, गुन्ह्यादरम्यान आरोपी संजय रॉयने कुणाशी इंटरनेट कॉल किंवा व्हिडीओ कॉल केला होता का, याचाही तपास सुरु

७. उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमध्ये कोलकात्यासारखी घटना , लूटमार केल्यानंतर बलात्कार करुन नर्सची अतिशय निर्घृणपणे हत्या, आरोपीला राजस्थानातून अटक, रवानगी पोलीस कोठडीत

८. आयकर विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख संपली, मुदतीपूर्वीच आयटीआर दाखल करणारे करदाते आता परताव्याच्या प्रतीक्षेत, पण अजूनही काही करदात्यांना परतावा नाही, काय करावे, वाचा इथे क्लिक करुन

९. ठरलं तर मग मालिकेत प्रिया अर्जुनच्या खोलीत, अर्जुनचा मात्र शिंकांचा सपाटा, विलासचा विषय निघणार तोच सटकली, अर्जुनचं आडपडदा न ठेवता सायलीला खरं सांगणं, सायली सुखावली, तर प्रतिमा स्वतःच्या छबीला न्याहाळण्यात हरखली

१०. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा फोटो चर्चेत, राज ठाकरेंच्या पेहरावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीसोबत फोटो, राज ठाकरे यांच्या आयुष्यावर सिनेमा येत असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा

Source link

Breaking Newstoday breaking newstoday headlinestop 10 headlinestop 10 headlines newstop 10 latest newsआजच्या ठळक बातम्याआजच्या बातम्याटॉप 10 ताज्या बातम्याठळक बातम्या
Comments (0)
Add Comment