काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा जाहीर पाठिंबा, ठाकरेंची भूमिका

मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का? असा प्रश्न महायुतीतील नेते विचारत आहेत, पण पृथ्वीराज चव्हाण किंवा शरद पवार यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा पाठिंबा असेल, असं खुलं आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ आज मुंबईतील षणमुखानंद सभागृहात वाढवण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी पहिलं भाषण करत सिक्सर लगावला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

कालच स्वातंत्र्यदिन झाला, आजपासून पुढच्या लढाईची सुरुवात होत आहे. माझं निवडणूक आयोगाला सांगणं आहे, की महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करावी, आमची तयारी आहे. बोलणं सोपं आहे पण लढाई कठीण आहे. लोकसभेला राजकीय शत्रूंना पाणी पाजलं, ती संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. आता विधानसभेला महाराष्ट्र धर्मरक्षण, अस्मिता, स्वाभिमान जपण्याची लढाई आहे. ते महाराष्ट्र लुटायला आलेत. एक तर तू राहशील किंवा मी राहीन, या जिद्दीने लढायला पाहिजे, असं मी नेहमी म्हणतो. फक्त हे आपल्या तिघा मित्रपक्षात व्हायला नको. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि आमच्यात आपसात तू राहशील की मी, असं नको व्हायला, अशी मिश्कील टिपणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

सरकारला आता जाग आली आहे, ते डुबक्या मारत आहेत की पवित्र होता येईल का बघत आहेत. स्वतःचे फोटो सगळीकडे छापत आहेत. पण तुम्ही उमेदवारी मला मिळाली नाही तरी चालेल पण यांना खाली खेचू, असं बघा. युतीत बसून काड्या करणारे खूप जण आहेत. सारखे विचारतात,
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का? माझं पृथ्वीराज बाबा किंवा शरद पवार यांना सांगणं आहे, की मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा असेल. आताच्या आता जाहीर करा, पाठिंबा देतो की नाही पहा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मी माझ्यासाठी लढतोय ही भावना नाहीये. मी महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय, जो झोपवण्याची हिंमत करतो, त्याला गाडून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे. मुख्यमंत्रिपदाचं आम्ही बघू काय ते. युतीत असताना ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री हे धोरण होतं. पण यामुळे एकमेकांच्या पायावर धोंडा पाडण्यात वाया घालवली. कारण युतीत आपापसात स्पर्धा लागायची आमचे आमदार जास्त यावे, म्हणून त्याचे पाडा याची. आज मुंबईत मी यजमानपद स्वीकारत ओपनिंग प्लेयर व्हायचं ठरवलं, असंही ठाकरे म्हणाले.

Source link

Maha Vikas Aghadi Mumbai Rallymaharashtra assembly election 2024Vidhan Sabha Nivadnukउद्धव ठाकरे भाषणउद्धव ठाकरे मविआ मेळावा भाषणमहाविकास आघाडी मुख्यमंत्री उमेदवारमहाविकास आघाडी मेळावा
Comments (0)
Add Comment