नाना, तुम्ही नसताना काँग्रेस-NCP ला म्हटलं, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, ठाकरेंचा चिमटा

मुंबई : आजपासून पुढील लढाईची सुरुवात होणार आहे. आज निवडणूक जाहीर करा, आमची तयारी आहे. लढाई अशी लढायची की, एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील. लोकसभेत आपण राजकीय शत्रूला पाणी पाजलं. आता विधानसभेची लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई आहे. महाराष्ट्र लुटायला आलेल्यांचं आपल्यासमोर आव्हान आहे. महाराष्ट्राला झोपवण्याची जो हिंम्मत करतो, त्याला आम्ही गाडून टाकतो, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मघाशी नाना, तुम्ही नव्हतात. मी बोललो की, मुख्यमंत्री कोण होणार? आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा. मी त्याला पाठींबा सगळ्यांच्यासमोर द्यायला तयार आहे, असं म्हणत ठाकरेंनी आपली ठाकरेंची स्पष्ट भूमिका मांडली. महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ आज मुंबईतील षणमुखानंद सभागृहात वाढवण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीत भाषण करत सरकारवर ताशेरे ओढले.कोणाचंही नाव मुख्यमंत्रीदासाठी जाहीर करा, त्याला माझा पाठींबा आहे. आम्हाला विचारतात, मुख्यमंत्री कोण होणार? आम्ही बघू काय करायचं ते. भाजपसोबतच्या अनुभवाची मला पुनरावृत्ती नकोय. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री या सूत्रात धोका आहे. जागा जास्त येण्यासाठी आपल्यातच पाडापाडी केली जाते. आम्हाला भारत सरकार हवे, मोदी सरकार नको. घोटाळेबाज योजनांच्या जाहिराबाजीसाठी जनतेच्या पैशांची लूट होत आहे. गावागावांत जाऊन आपली चांगली कामं सांगा, असंही ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
Uddhav Thackeray : काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा पाठिंबा, ठाकरेंची स्पष्ट भूमिका

राज्यात विधानसभा निवडणुका लांबवण्याचा कट आहे. आपण केलेली कामं लोकांना विसरायला लावण्यासाठी निवडणुका पुढे ढकलत आहेत. लाडकी बहिणसारख्या योजना आणल्या आहेत, पण पैसे कुठे आहेत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला. सरकार पाडायला ५० खोके, लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये. मोदींनी म्हटलं होतं १५ लाख खात्यात येतील, त्या १५ लाखाचे १५ कसे झाले? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं

यावेळी उद्धव ठाकरेंनी बांगलादेशातील परिस्थितीबाबत देखील भाष्य केलं. ते म्हणाले की, बांगलादेशातील लोकशाही तुम्हाला परवडणार आहे का? भूतकाळात डोकावतो तेव्हा आम्हाला रामशास्त्री प्रभूणे दिसतात. करोना काळात आमच्या सरकारने काम केलं, ते मुस्लीम बौद्ध विसरले नाहीत. सीएए, एनआरसीबाबत आपण दिलेला शब्द लोकांच्या लक्षात राहिला. सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडलं? वक्फच्या जमिनी ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असाल आमचा विरोध आहे. वक्फ, कोणत्याही धर्माच्या जागा असतील तर वेडंवाकडं करु देणार नाही, अशा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.

Source link

assembly election uddhav thackeray speechmahavikas aghadi rally assembly electionshanmukhananda auditorium uddhav thackeray speechUddhav Thackeray newsउद्धव ठाकरे बातम्यामहाविकास आघाडी रॅली विधानसभा निवडणूकविधानसभा निवडणूक उद्धव ठाकरे भाषणषणमुखानंद सभागृह उद्धव ठाकरे भाषण
Comments (0)
Add Comment