ठाकरेंचं भाषण सुरु झालं, पटोलेंना पोहोचायला उशीर, पण मोठी कामगिरी फत्ते, भाजपचा बडा नेता फोडला

मुंबई : विधानसभा निवडणूक २०२४ च्या दृष्टीने महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. यासाठी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा तिन्ही पक्षातील नेत्यांची उपस्थिती होतं. या मेळाव्याला येण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काहीसा उशीर झाला. ठाकरेंचं भाषण सुरु असतानाच त्यांनी षण्मुखानंद सभागृहात त्यांचा प्रवेश झाला. मात्र यावेळी पटोले एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडत होते.

भंडारा गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पूर्व विदर्भात काँग्रेस संघटन अधिक मजबूत होण्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. टिळक भवन येथे शिशुपाल पटले यांचा पक्षप्रवेश झाला.
Uddhav Thackeray : काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा पाठिंबा, ठाकरेंची स्पष्ट भूमिका
यावेळी नाना पटोले म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या गैरकारभाराविरोधात जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारच्या सत्ताकाळात शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, तरूण, व्यापारी, मध्यमवर्गीय असा एकही समाज घटक समाधानी नाही. महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्य दिवाळखोर केले आहे. प्रत्येक कामामध्ये ४०-५० टक्के कमिशन घेतले जात आहे. राज्यात “कमिशन द्या आणि टेंडर घ्या” हे एकच काम सुरु असल्याची टीकाही नानांनी केली.

शिशुपाल पटले

शेतकरी, बेरोजगारांसह सर्वसामान्य जनतेला या सरकारने वाऱ्यावर सोडलंय. भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षातील नेतेही या सरकारच्या कामावर खुश नाहीत, त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक जणांनी काँग्रेस पक्षात केला आणि आगामी काळातही अनेक बडे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, असा दावाही यावेळी नाना पटोलेंनी केला.
MVA Mumbai Rally : ना पटोले, ना बाबा, ना थोरात, काँग्रेसने सलामीला ‘नाराजा’ला उतरवलं जोरात; कुणी वाढवला नारळ?

पक्षप्रवेशानंतर शिशुपाल पटले म्हणाले की, आपण अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम केले पण आता तो भाजप राहिला नाही. तो आता व्यापारी आणि ठेकेदारांचा पक्ष झाला आहे. या पक्षाला शेतकरी सर्वसामान्य जनतेशी काही देणंघेणं नाही. ईडी सीबीआय यासारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडण्याचे घृणास्पद प्रकार करून सत्ता मिळवण्याचा हव्यास आम्हाला आवडलेला नाही. या देशातील आणि राज्यातील जनतेला न्याय देण्याचे आणि राज्याला पुढे घेऊन जाण्याचे काम काँग्रेस पक्षच करू शकतो, त्यामुळेच नाना पटोलेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे शिशुपाल पटले म्हणाले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, तुमसरचे माजी आमदार अनिल बावनकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Source link

maharashtra assembly election 2024Maharashtra politicsVidhan Sabha Nivadnukउद्धव ठाकरे भाषणनाना पटोले पत्रकार परिषदनाना पटोले भाषणभाजप नेता काँग्रेसमध्येमहाविकास आघाडी मेळावाशिशुपाल पटले काँग्रेस प्रवेश
Comments (0)
Add Comment