महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर! आयोगाने सांगितले कारण; विरोधकांचा अंदाज खरा ठरला?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या २६ नोव्हेंबरला संपणार आहे. अशातच ज्यातील विधानसभा निवडणुका ऑक्टोबरला पार पडतील असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. निवडणुक आयोगाने महाराष्ट्र निवडणुकाचं वेळापत्रक मात्र जाहीर केले नाही. झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील निवडणुका जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील निवडणुका पार पडल्यावर होतील असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले आहे.

झारखंड विधानसभेची मुदत ४ जानेवापी २०२५ पर्यंत आहे तर महाराष्ट्राची २६ नोव्हेंबरपर्यंत आहे.२०१९ मध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका पार पडल्या होत्या. यंदा मात्र दोन्ही राज्यात वेगवेगळ्या निवडणुका पार पडणार आहे. दिवाळीआधी राज्यात निवडणुका पार पडतील असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून मांडण्यात येत होता मात्र आता दिवाळीनंतर निवडणुका पार पडतील असे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगानेच दिले आहेत.
Jammu Kashmir Vidhan Sabha Election Date Announcement LIVE : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक जाहीर, १०० कोटी जप्त झाल्याची माहिती

महाराष्ट्राच्या निवडणुकाची तारीख जाहीर न करण्यामागे काही राजकीय कारण आहे का? असा सवाल विचारण्यात आला. यावर निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले, प्रश्न विचारणे सोपे आहे आरोप करणे सोपे आहे असे म्हणाले, पुढे त्यांनी उत्तर दिले. महाराष्ट्रात पाऊस असल्या कारणाने निवडणूक आयोगाचे बरेचसे काम राज्यात बाकी राहिले आहे. तसेच महाराष्ट्रात पुढील काही दिवसात बरेच सण उत्सव आहेत, जसे की गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र, दिवाळी यामुळे निवडणूक आयोगाने वेळा पत्रक जाहीर केले नाही. याच कारणामुळे निवडणुकाची तारीख जाहीर केली नाही असे आयुक्त म्हणाले.


आयोगाच्या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात रंगत असलेली चर्चा खरी ठरणार आहे. राज्यात दिवाळीनंतर निवडणुका पार पडतील असे विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात होते तसेच काही चित्र आजच्या पत्रकार परिषदेत आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर मध्ये तीन टप्प्यात मतदान होणार. पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार १८ सप्टेंबर, दुसरा टप्प्यातील मतदान पार पडणार २५ सप्टेंबरला, तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार १ ऑक्टोबरला आणि निकाल लागणार ४ ऑक्टोबरला, तर दुसरीकडे हरियाणा मध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडणार, १ तारखेला मतदान पार पडणार तर ४ तारखेला हरियाणा राज्याच्या विधानसभेचा निकाल लागणार.

म्हणजेच निवडणुक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी माहिती दिल्यानुसार ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर होईल आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळी संपताच राज्यात निवडणूक प्रक्रिया पार पडेल असा अंदाज मांडण्यात येत आहे.

Source link

assembly election date of maharashtraelection commissionelection commission on maharashtra electionmaharashtra assembly electionमहाराष्ट्रविधानसभा इलेक्शनविधानसभा निवडणुकाविधानसभा निवडणूक बातमी
Comments (0)
Add Comment