सुब्रमण्यम स्वामी यांची सुप्रीम कोर्टात धाव
सुब्रमण्यम स्वामी यांचे सहकारी वकील सत्य सभरवाल यांनी याचिकेत म्हटले आहे, राहुल गांधी यांची युकेस्थित कंपनी आहे जिचे नाव बॅकऑपस.लिमिटेड असे आहे. याच कंपनीत राहुल गांधी डायरेक्टर आहेत. १० ऑक्टोबर २००५ साली याच कंपनीत राहुल गांधींनी ब्रिटीश नागरिक म्हणून आयटी रिटर्न भरला आहे. स्वामींचे वकील सभरवाल म्हणाले, राहुल गांधींनी भारतीय नागरिकत्व कायदाचे उल्लघंन केले आहे असे याचिकेत नमूद केले आहे. गृहखात्याने प्रकरण गांभीर्याने घेत राहुल गांधींची चौकशी केली पाहिजे अशी मागणी सुद्धा स्वामी यांनी केली आहे.
सुब्रमण्यम स्वामींचा आरोप काय?
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते की राहुल गांधी भारतीय नाहीत आणि पीएम मोदी तसेच केंद्राचे गृहखाते याविरोधात कोणतीही कारवाई करत नाही असे म्हणत त्यांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच,सोनिया गांधी मोदी शाहांना ब्लॅकमेल करतायत का? असा सवाल सुद्धा स्वामींनी उपस्थित केला आहे. साधारण २०१७ साली राहुल गांधी यांच्या नागरिकतेवर सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. तेव्हाचे तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहत त्यांनी चौकशीची मागणी केली होती. परंतु आता याच प्रकरणात थेट मोदी आणि शाहांविरोधात सुब्रमण्यम स्वामी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
२०१९ साली सुब्रमण्यम स्वामी यांनी हेच आरोप लगावले होते यावर राहुल गांधींकडून गृहखात्याने नोटीस पाठवत खुलासा करण्याचे आवाहन केले होते. तीच नोटीस पुन्हा पोस्टवर जोडत राहुल गांधींच्या नागरिकतेवर स्वामींनी टीका केली आहे. सोबतच सुब्रमण्यम स्वामी यांनी लंडनच्या आयटी रिर्टन फाईलची कॉपी जोडली आहे. स्वामी यांनी उल्लेख केला की, राहुल गांधी यांनी ब्रिटीश नागरिक म्हणून ब्रिटीश सरकारकडे आयटीआर भरला आहे.