मुलीला ‘सामोसा’ म्हणून चिडवले, वडिलांनी ९ वर्षाच्या मुलासोबत पाहा काय केले; सोसायटीत १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात तमाशा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सोसायटीच्या आवारात मुलांची दंगामस्ती सुरू असताना, मुलीला ‘सामोसा’ म्हणून चिडविल्याच्या, तसेच तिच्या दिशेने प्लॅस्टिकच्या कचरा पेटीला लाथ मारल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी नऊ वर्षांच्या मुलाला कानशीलात लगावल्याने त्याची शुद्ध हरपली. या मुलाच्या कानाच्या पडद्याचा आतील भाग आणि उजव्या जबड्याला सूज आली असून, त्याला मारणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या मुलाच्या आईने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास औंध परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली. सोसायटीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने रहिवाशांच्या लहान मुलामुलींना खाऊ वाटप करण्यात आले. त्यानंतर सर्व मुले-मुली आपसांत खेळत होते. त्यामुळे तक्रारदार आपल्या घरी गेल्या. त्यांचा मुलगा आणि आरोपीची मुलगी आपसांत खेळताना दंगामस्ती करत होते. त्यावेळी मुलीने मुलाच्या हातावर ओरबडले. त्यामुळे मुलाने तिथे असलेल्या प्लॅस्टिकच्या कचरापेटीला तिच्या दिशेने लाथाडले. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी पाठीमागून येत मुलाच्या उजव्या कानशीलात दिली. त्यामुळे मुलगा कळवळून दहा मिनिटे सुन्न होऊन खाली पडला. त्याची शुद्ध हरपली होती. थोड्या वेळाने त्यांचा मुलगा रडत घरी आल्यावर तक्रारदारांना हा प्रकार समजला.
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांनी नको तो विषय काढला, मुस्लिमांचा संताप, गुन्हाही दाखल; जाणून घ्या काय नेमके काय घडले

त्यानंतर त्यांनी सोसायटीच्या आवारात येत आरोपींना मुलाला मारहाण का केली, असा जाब विचारला. त्यावेळी आपल्या मुलीला ‘सामोसा, सामोसा’ म्हणून चिडवत असल्याने, तसेच तिच्या दिशेने कचरा पेटी लाथाडल्याने राग येऊन मुलाला मारल्याचे प्रत्युत्तर आरोपीने दिले. त्यामुळे तक्रारदारांनी मुलाला घेऊन चतु:श्रृंगी पोलिसांकडे धाव घेतली. या मुलावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. या मुलाच्या कानाच्या पडद्यातील भाग आणि उजवा जबडा सुजला असल्याचे ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.
कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; मर्दानी खेळावर तयार करण्यात आलेल्या ‘वारसा’ माहिती पटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

कानशीलात लगावलेल्या मुलावर उपचार सुरू आहे. दरम्यान चतु:श्रृंगी पोलिसांनी संबंधित मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

Source link

pune local newspune marathi newsPune Policeteasing daughter as samosaचतु:श्रृंगी पोलिस ठाणेपुणे ताज्या बातम्यापुणे बातम्यामुलाला कानशीलात लगावले
Comments (0)
Add Comment