आता याच प्रकरणावरुन महायुतीत सुद्धा मिठाचा खडा पडला आहे. आशिष शेलार नाशिक परिस्थितीवर बोलताना म्हणाले, ज्यांनी कोणी दगडफेक केली असेल, कायदा सुव्यवस्था हातात घेतला असेल त्यांचावर कारवाई झाली पाहिजे. सकल हिंदू जर इथे मोर्चा काढणार नाही तर कुठे काढणार जर मोर्चामुळे कोणाची पोटदुखी झाली असेल त्यांची पाठ सोलून काढा असे आशिष शेलार यांनी विधान केले आहे. यावरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरींनी मात्र शेलारांच्या भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले कायदा सुव्यवस्था किंवा कोणात्याही धर्माबद्दल चिथावणीखोर वक्तव्य किंवा तेड निर्माण करणारे विधान करु नये यामुळे शांतता सुव्यवस्था बिघडवते. महायुतीत काम करणाऱ्या कोणत्याही आमदाराने सोलून काढू, ठोकून काढू, मारुन टाकू अशी भाषा बोलूच नये. अशी भाषा असंवैधानिक आहे. आता आशिष शेलार कशावर बोलले हे पाहिले पाहिजे पण त्यांनी कृपा करून असे बोलणे टाळावे असा सल्ला आशिष शेलार यांना मिटकरींनी दिला.
रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर नंतर अहमदनगरमध्येही दिसून आले. रामिगिरी महाराज यांनी प्रेषित महमंद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर या विधानावरुन मुस्लीम समाजात मोठा संपात व्यक्त होत आहे. रामगिरी महाराज यांच्या विधानाविरोधात अहमदनगरलाही आंदोलन करण्यात आलं. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात नाशिक, येवला आणि वैजापूर इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रामगिरी महाराजांच्या नाशिकातील कार्यक्रमात काही वेळापूर्वीच सीएम शिंदे यांनी हजेरी लावली होती भाजप आणि शिंदे गटाचे नेते या कार्यक्रमाला हजर राहिले होते.