रेल्वेत विसरला दीड लाखांची रोख रक्कम, पोलिसांच्या दक्षतेमुळे व्यक्तीला अशी मिळाली हरवलेली बॅग

डोंबिवली : डोंबिवलीत राहणारा एक प्रवासी गुरुवारी मुंबईहून डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करत होता. त्यावेळी डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरताना तो व्यक्ती त्याची बॅग लोकलमध्ये विसरला. घरी गेल्यानंतर या प्रवाशाला १ लाख ६१ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लोकलमध्ये विसरल्याचं लक्षात आलं. ही बॅग डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना ठाकुर्ली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये गस्त घालताना आढळली. पोलिसांनी या प्रवाशाचा शोध घेऊन त्याची रोख रक्कम असलेली बॅग त्याला परत केली आहे.

पोलिसांनी परत केली पैशांची बॅग

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या अंमलदाराच्या प्रामाणिकपणामुळे ही पैशांची बॅग प्रवाशाला परत मिळाली. जयराम संजीव शेट्टी (४२) असं लोकलमध्ये बॅग विसरलेल्या प्रवाशाचं नाव आहे. जयराम शेट्टी हे गुरुवारी आपल्या काही कामानिमित्त डोंबिवलीहून विक्रोळी येथे गेले होते. काम उरकून ते संध्याकाळी डोंबिवलीतील घरी येण्यास निघाले. विक्रोळी रेल्वे स्थानकात त्यांनी कल्याणला जाणारी लोकल पकडली. या लोकलने प्रवास करत असताना त्यांनी आपल्या जवळील १ लाख ६२ हजार रुपयांची पिशवी लोकलमधील रॅकवर ठेवली आणि ते मोबाईलमध्ये व्यस्त झाले.
Mumbai Police News: कॅबमध्ये २५ लाखांचे दागिने विसरले, ड्रायव्हरचा फोन बंद; मुंबई पोलिसांनी अशी मिळवून दिली दागिन्यांची बॅग

लोकमध्येच राहिली पैशांची बॅग

डोंबिवली स्थानक आल्यानंतर घाईगडबडीत ते लोकलमधील रॅकवर ठेवलेली बॅग घेण्यास विसरले. घरी गेल्यानंतर रोख रक्कम असलेली बॅग आपण लोकलमध्ये विसरल्याचं त्यांच्या लक्षात आल्यावर शेट्टी अस्वस्थ झाले. दरम्यान, लोकल डोंबिवली सोडून कल्याणच्या दिशेने रवाना झाली होती. १५ ऑगस्ट निमित्त लोहमार्ग पोलीस ठाकुर्ली रेल्वे स्थानकात गुरुवारी संध्याकाळी गस्त घालत होते. रेल्वे स्थानकात लोकल आल्यावर रावसाहेब चौधरी, रोहिणी बांबले, अभिमन्यू बोईनवाड, प्रगती जाधव या कर्मचाऱ्यांनी लोकल डब्यात काही संशयास्पद वस्तू नाही ना याची खात्री करण्यासाठी तपासणी सुरू केली.
Nashik News : शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लागलं, नाशकात दोन गट एकमेकांना भिडले, नेमकं काय घडलं?

पोलिसांना एका रॅकवर एक काळी बॅग असल्याचं आढळलं. तेथे कोणीही प्रवासी नसल्याने पोलिसांना संशय आला. बॅगचे फोटो/व्हिडियो काढून तपासणी केली असता त्यात रोकड आढळून आली. सदर बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रांवरुन जयराम शेट्टी यांची असल्याचं समजल्यावर पोलिसांनी शेट्टी यांना संपर्क केला. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन सदर बॅग वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या उपस्थितीत त्यांना परत करण्यात आली. बॅग जशीच्या तशी परत मिळाल्यामुळे जयराम शेट्टी यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

Source link

dombivali man found 1 lakh lost bagdombivali newsdombivali police newsडोंबिवली बातमीडोंबिवली रेल्वे स्टेशन रोख रक्कम बॅग
Comments (0)
Add Comment