‘कोणी काय करावे हे ‘स्टंटमॅन’नी सांगू नये; सरकार लोकांसाठी काम करत आहे’; अमृता फडणवीसांचा विरोधकांवर प्रहार

नागपूर (जितेंद्र खापरे) : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चर्चा आहे. राज्य सरकारने 15 ऑगस्टला दोन महिन्यांचा हप्ताही खात्यावर पाठवला आहे. मात्र, विरोधी महाविकास आघाडी या योजनेवरून सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. ‘लाडकी बहिण योजनेच्या माध्यमाने सरकार मते विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे विरोधी पक्षनेते सांगत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपावर जोरदार प्रहार केला आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, स्टंटमॅन लोकांनी सांगायला नको. इथे स्टंट सुरू आहे. हे लोकांसाठी काम करत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला मोर्चा तर्फे श्रावण सरी आणि मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी अमृता फडणवीस म्हणाले, “लाडकी बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींना ही गिफ्ट आहे. त्यांना मिळणारा पैसा त्यांना लहान-मोठ्या कोणत्याही गरजा असेल त्यांना थोडाफार हातभार लागेल . आणि त्यांच्या गरजा नक्कीच पूर्ण होतील.”
Assembly Election: निवडणुका जाहीर झाल्या अन् भाजपच्या पोटात गोळा आला; हरियाणात सत्ता राखण्याचे तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठी कसोटी

विरोधकांच्या आरोपावर अमृता यांनी पलटवार करत म्हटले की, “कोणी काय करावे हे स्टंटमननी सांगू नये. सरकार लोकांसाठी काम करत आहे”. पुढे बोलतांना अमृता फडणवीस म्हणाल्या,नागपूर हे माझे माहेर आणि सासर आहे त्यामुळे काही ना काही कार्यक्रमा निमित्ताने मी नियमीतपणे येत असते. त्यामुळे संपर्क होत आहे त्याचाही आनंद आहे. हा देवेंद्रजींचा मतदारसंघ आहे, मात्र मी दुसरीकडे जात असते, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या निमंत्रण पत्रिकेतून शरद पवारांचे नाव वगळले

पश्चिम बंगालमधील हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेचा अमृता फडणवीस यांनी निषेध केला आहे. त्यासोबतच या घटनेतील पश्चिम बंगाल राज्य सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. अमृता फडणवीस म्हणाल्या, अशा घटनांवर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. याचा पेक्षा खराब गोष्ट काही नाही होऊ शकत.

Source link

amrita fadnavis on ladki bahin yojanaMukhyamantri Majhi Ladki Bahin Yojananagpur latest newsnagpur news todayअमृता फडणवीसभाजपमहायुती सरकारमहाविकास आघाडीमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
Comments (0)
Add Comment