अटल सेतूवरून आत्महत्या केल्याची घटना याआधी देखील समोर आली आहे. २४ जुलै रोजी एका ३८ वर्षीय व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली होती. श्रीनिवास कुरुकुट्टी असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते. डोंबिवलीत राहणाऱ्या श्रीनिवास यांनी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले होते. श्रीनिवास हे २४ जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अटल सेतूवर आले आणि त्यांनी चारचाकी गाडी पार्क करून थेट समुद्रात उडी मारली.
या घटनेच्या काही दिवस आधी अन्य एका व्यक्तीने वरळी येथील सी-लिंकवरून उडी मारून आत्महत्या केली होती. धक्कादायक म्हणजे संबंधित व्यक्तीने आत्महत्याकरण्या पूर्वी मुलाला फोन केला होता. मुंबई शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यात अशा प्रकारे टोकाचे निर्णय घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
१० जुलै रोजी भाईंदर रेल्वे स्थानकात अशीच एक घटना घडली होती ज्याने संपूर्ण मुंबई हादरली होती. बाप आणि लेकाने अचानक धावत्या लोकलसमोर येत आत्महत्या केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज देखीस समोर आले होते. ज्यात वडील आणि मुलगा फलाट क्रमांक ६ वरून चालत गेले आणि अचानक रेल्वे रुळावर झोपले. भाईंदर रेल्वे स्थानकावरून निघालेल्या रेल्वेखाली येऊन दोघांचा मृत्यू झाला होता.