शनिवार १७ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर २६ श्रावण शके १९४६, श्रावण शुक्ल द्वादशी सकाळी ८-०५ पर्यंत, त्रयोदशी उत्तररात्री ५-५१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा सकाळी ११-४८ पर्यंत, चंद्रराशी: धनू सायं. ५-२८ पर्यंत, सूर्यनक्षत्र: मघा
पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र प्रारंभ, प्रीती योग सकाळी १० वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर आयुष्यमान योग प्रारंभ, बालव करण सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपर्यत त्यानंतर गरण करण प्रारंभ, चंद्र सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२२
- सूर्यास्त: सायं. ७-०४
- चंद्रोदय: सायं. ५-२१
- चंद्रास्त: पहाटे ३-२६
- पूर्ण भरती: सकाळी १०-२९ पाण्याची उंची ३.९५ मीटर, रात्री १०-१५ पाण्याची उंची ३.४१ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-२४ पाण्याची उंची १.०३ मीटर, सायं. ४-३२ पाण्याची उंची २.०९ मीटर
- दिनविशेष: शनिप्रदोष, अश्वत्थ मारूती पूजन, भगवान जिव्हेश्वर जयंती, संत नरहरी महाराज जयंती, संत ताजुद्दिनबाबा पुण्यतिथी
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २५ मिनिटे ते ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३६ मिनिटांपासून ते ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ३ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ५८ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २० मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून २९ मिनिटांपासून ते ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून ५१ मिनिटांपासून ते ६ वाजून ४४ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
पाण्यात गुळ घालून शंभोशंकरावर अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त)