कार्यक्रम युतीचा पण स्टेडियम शरद पवारांचे! नाव वगळले पण..;अमोल कोल्हेंनी सुनावले सरकारला खडेबोल

परभणी, डॉ.धनाजी चव्हाण : लाडकी बहीण योजनेचा उद्या पुण्यात राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. याच सरकारी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून शरद पवारांचे नाव वगळण्यात आले आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य करत महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. अमोल कोल्हे म्हणाले, ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ते स्टेडियमच शरद पवार यांनी बांधलेले आहे, आणि महिलांसाठी कार्यक्रम ज्या खात्यामार्फत घेण्यात आहे, ते म्हणजे महिला आणि बालकल्याण विभाग, पण ते सुद्धा शरद पवारांनी सुरू केले आहे. त्याच खात्याच्या माध्यमातून महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली पण त्याच कार्यक्रमाच्या पत्रिकेवर पवारांचं नाव नसावं म्हणजे हा सत्ताधाऱ्यांचा कोतेपणा आहे अशा शब्दात अमोल कोल्हेंनी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.
मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या निमंत्रण पत्रिकेतून शरद पवारांचे नाव वगळले

नेमके प्रकरण काय?

राज्यस्तरीय चर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उद्या शुभारंभ पुण्यात होणार आहे. मात्र राज्यसभेचे खासदार असणाऱ्या शरद पवारांचं नाव वगळले असे निमंत्रण पत्रिकेत दिसत आहे. याच निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह आमदार खासदार यांची पत्रिकेत नाव नमूद करण्यात आली आहेत.तसेच निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांची नाव नमूद करण्यात आली आहे. परंतु शरद पवार यांचे पत्रिकेत नाव नसल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा बराच बोलबाला राज्यात सुरु आहे. अशातच विरोधकांनी याच योजनेवर निवडणुकीची योजना असे म्हणत टीकेची झोड उठवली होती अशातच आता शरद पवारांचे नाव वगळल्याने नवा वाद उफाळला आहे.

शुभारंभाआधीच पैसै खात्यात जमा!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास बुधवारपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून १७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, १४ ऑगस्ट अर्थात, बुधवारपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Source link

ladki bahin yojna newsladki bahin yojna updateअमोल कोल्हेमहाराष्ट्र सरकार योजनाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाडकी बहीण योजनालाडकी बहीण योजना शुभारंभशरद पवार
Comments (0)
Add Comment