परत या ना आपल्या राष्ट्रवादीत! भरसभेत कार्यकर्त्याचं साकडं; भाषण थांबवून दादांनी काय केलं?

पिंपरी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरु आहे. या माध्यमातून अजित पवारांचा राज्यभर दौरा सुरु आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरीमध्ये आहेत. अजित पवारांचं भाषण सुरु असताना एका कार्यकर्त्यानं अचानकपणे घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याच्या हातात एक फलक होता. त्यावरील मजकूर लक्षवेधी होता. कार्यकर्त्याच्या घोषणा ऐकून अजित पवारांनी त्यांचं भाषण काही क्षणांसाठी थांबवलं.

पिंपरीतील सभेत अजित पवारांचं भाषण सुरु होतं. गुलाबी जॅकेट घालून आलेले अजित पवार उपस्थितांशी संवाद साधत होते. तेव्हा तिथे असलेला एक तरुण अचानक जोरदार घोषणाबाजी करु लागला. अजितदादा, अजितदादा असं तो मोठमोठ्यानं ओरडत होता. आपला आवाज अजित पवारांपर्यंत पोहोचावा, असा त्याचा प्रयत्न होता. त्याचा आवाज ऐकून अजित पवारांनी काही वेळ भाषण थांबवलं.
Uddhav Thackeray: ज्याच्या जास्त जागा, त्याचा CM; ठाकरेंनी मविआच्या सभेत सांगितला सुत्रातील गंभीर धोका
अजितदादांना मोठ्या आवाजात साद घालणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातात एक बॅनर होता. त्यावर ‘आवाज निष्ठावंत कार्यकर्त्याचा, दादा या ना परत आपल्या राष्ट्रवादीत,’ असा मजकूर होता. या मजकुराखाली शरद पवार आणि अजित पवारांचा फोटो होता. बॅनरवरील मजकूर गुलाबी रंगात होता. बॅनरवरील मजकुरानं आणि कार्यकर्त्याच्या मोठ्या आवाजानं सगळ्यांचं लक्ष वेधलं.
Uddhav Thackeray : काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा पाठिंबा, ठाकरेंची स्पष्ट भूमिका
तरुण जोरजोरात अजितदादा म्हणत उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात एक जण तरुणाच्या जवळ आला. त्यानं तरुणाच्या हातातला बॅनर हिसकावून घेतला. तरुणानं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. समोर अचानक गोंधळ झालेला पाहून अजित पवारांनी भाषण थांबवलं. तुझ्याशी बोलतो मी नंतर, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं भाषण सुरुच ठेवलं.

अजित पवारांची जनसन्मान यात्रा सध्या सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातून त्यांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते कार्यकर्ते, सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत आहेत. विशेषत: महिलांशी संवाद साधत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर त्यांचा विशेष भर आहे. जनसन्मान यात्रेच्या गुलाबी बसवरही योजनेचा उल्लेख आहे. लक्षवेधी बाब म्हणजे बसवर असलेल्या नावातून मुख्यमंत्री शब्द वगळण्यात आलेला आहे.

Source link

ajit pawar pimpariajit pawar speechMaharashtra Political Newsncpअजित पवारअजित पवार भाषणमहाराष्ट्र राजकीय बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Comments (0)
Add Comment