सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
लोकसभेपर्यंत कोणालाच त्यांची बहीण आठवली नाही, निवडणुकीच्या निकालानंतरच बहिणी आठवायला लागल्या आहेत. दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही. ते प्रेम आणि व्यवसायात गल्लत करत राहिले. प्रेमात व्यवसाय नसतो आणि पैसे नसतात. व्यवसायात प्रेम नाही. व्यवसायात प्रेम करायला गेलं तर घाट्याच्या धंदा होईल. प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणत नाही, दुर्दैव आहे महाराष्ट्र सरकारचं त्यांना व्यवसाय आणि प्रेमातील अंतरच कळालं नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना सुनावलं.
बोलताना म्हणाले की, एक बहिण गेली तर हरकचत नाही, आम्ही दुसऱ्या बहिणी आणू, १५०० रुपयात हे नाते विकावू नाही आहेत. हा आमच्या नात्याचा अपमान आहे, निरागस असणाऱ्या बहीण-भावाचं जे प्रेम असतं, त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्र सरकारने केलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आमचे दोन वीर बंधू भाषणात असं म्हणाले की, आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मत देत आहे. ऑक्टोबरच्या निवडणुकीनंतर मी तुमचाच भाऊ आहे, जशे दहा हजार दिले, तशे परत घ्यायचीही ताकद माझ्यात आहे. दुसरा म्हणतो की लिस्ट काढणार आहे. डिसेंबरमध्ये बघणार कुठल्या बुथवर किती मते पडले ते बघणार, मग बघणार नातं आहे की नाही. म्हणजे यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीये ते फक्त मताशी जोडलेलं नातं आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महायुतीला चांगलंच सुनावलं आहे. मला या दोन्ही भावांना सांगायचं आहे की, सगळ्या नको, फक्त एका बहिणीचे पैसे परत घेऊन दाखवा मग काय करायचं आहे ते मी बघते, असा इशाराही सुप्रिया सुळेंनी दिला.