ना पटोले, ना बाबा, ना थोरात, काँग्रेसने सलामीला ‘नाराजा’ला उतरवलं जोरात; कुणी वाढवला नारळ?

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओपनिंग बॅट्समन म्हणून भाषण करत प्रचाराचा नारळ वाढवला. त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषण केलं. तर काँग्रेसकडून सलामीवीर म्हणून चक्क महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री आरिफ नसीम खान यांना उतरवण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अथवा विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याऐवजी लोकसभेच्या वेळी नाराज राहिलेल्या नसीम खान यांना प्रचारात आघाडी देत काँग्रेसने नवी खेळी केल्याची चर्चा आहे.

“असली शिवसेनेचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले, काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, संजय राऊत, जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, माकप भाकप नेते, आदित्य ठाकरे, मंचावर उपस्थित सर्व नेते, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते..” अशी नावांची जंत्रीच नसीम खान यांच्या भाषणाच्या सुरुवातीला होती.
Uddhav Thackeray: नाना, तुम्ही नसताना काँग्रेस-NCP ला म्हटलं, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, ठाकरेंचा चिमटा
“जयंत पाटील म्हणाले की आपण नवीन सिस्टम सुरु केली आहे, प्रचार प्रमुखाने पहिली बॅटिंग केली, उद्धव ठाकरे यांनी विस्ताराने मनमोकळी चर्चा केली, प्रेरणा देण्याचं काम केलं. महाविकास आघाडीचा निर्धार आहे, आजपर्यंत सर्व नेते विकासासाठी राबत आहेत. लोकसभेला आम्हाला प्रसाद मिळाला. मुंबईसह महाराष्ट्रात जास्तीत जास्त खासदार निवडून आले, लोकसभेला पायाखालची वाळू सरकली, तेव्हा त्यांना लाडकी बहीण आठवली, गेल्या अडीच वर्षात आठवण झाली नाही, त्यासाठी दोनशे कोटींची जाहिरात करत आहेत, पण तेच पैसे जर शेतकऱ्यांना दिले असते तर आत्महत्या थांबल्या असत्या” असंही नसीम खान म्हणाले.

Uddhav Thackeray : काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा पाठिंबा, ठाकरेंची स्पष्ट भूमिका
याआधी, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे आरिफ नसीम खान नाराज झाले होते. पक्षाने महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षाच्या प्रचार समिती आणि काँग्रेसच्या पुढील टप्प्यातील स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला होता. नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीत, असंही ते म्हणाले होते. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आलं होतं.

Source link

maharashtra assembly election 2024MVA Rally Congress leader speechVidhan Sabha Nivadnukआरिफ नसीम खान कोण आहेतउद्धव ठाकरे भाषणनसीम खान भाषणमहाविकास आघाडी मेळावा मुंबई
Comments (0)
Add Comment