असे आहेत बदल…
-बाणेर रस्त्याकडून येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे .
-विद्यापीठ चौकाकडून बाणेर रस्त्याने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळण घेऊन ‘किया शोरूम’ अंडरपास किंवा ‘ननावरे अंडरपास’मार्गे जावे.
-मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण महामार्गावरून बाणेर रस्त्यावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बालेवाडी जकातनाका येथून डावीकडे वळण घेऊन ‘हायस्ट्रीट’मार्गे गणराज चौकामधून इच्छितस्थळी जावे .
-पुणे शहरामधून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामधून बाणेर रस्तामार्गे न जाता पाषाण रस्त्यावरून चांदणी चौकमार्गे जावे किंवा विद्यापीठ चौकामधून औंध रस्तामार्गे जावे .
‘व्यापारी पद्धतीने योजनेकडे पाहू नका’- नीलम गोऱ्हे
पुणे : ‘महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयेच दिले जात असल्याची टीका विरोधक करीत आहेत. मात्र, भाऊबीजेची किंमत करायची नसते. त्यामुळे व्यापारी पद्धतीने या योजनेकडे पाहू नये,’ अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा औपचारिक राज्यस्तरीय शुभारंभ आज, शनिवारी (१७ ऑगस्ट) पुण्यात होणार आहे,’ असेही त्या म्हणाल्या. पूर्वी सत्तेवर असलेल्या विरोधकांना अशा योजना राबवता आल्या नाहीत. त्याची रूखरूख लागल्यानेच ही टीका होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. विरोधकांकडून या योजनेबाबत गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारने महिलांसाठी केवळ लाडकी बहीणच नाही, तर अन्नपूर्णा योजना, रोजगार प्रशिक्षणासाठी अर्थसाह्य, बचत गटातील महिलांना भांडवल, विद्यार्थिनींसाठी उच्च शिक्षण मोफत आदी योजना राबविल्या आहेत. पक्षातर्फे आठवडाभर या योजनांचा प्रचार प्रसार केला जाणार आहे,’ असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.