भाविक पाटील, म. टा. वृत्तसेवा, पालघर : जमीन बळकावणे, मारहाण करणे व इतर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात महिला गुंड गुलशन पटेल उर्फ आपा यांचा गुरुवारी मिरा-भाईंदर मध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चक्क स्थानिक आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता व इतर नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.मिरा-भाईंदर मध्ये गुलशन पटेल यांची मोठी दहशत आहे. त्यांच्यावर मिरा- भाईंदर व लगतच्या अनेक शहरात गुन्हा दाखल आहेत. ह्यात अपहरण, मारहाण ,बळजबरीने जमीन बाळकावणे, धारधार शस्त्राचा वापर करणे, आदी गंभीर स्वरूपाचे तब्बल सुमारे ३० गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते. त्यांच्यावर ह्यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई पोलिस प्रशासनाकडून आली असून मोक्का कायद्यांतर्गत कारवाईच्या हालचाली सुरू आहेत.
ह्या कारणास्तव मागच्या अनेक वर्षांपासून त्यांची महिला गुंड म्हणून ओळख झाली आहे. पटेल यांचा ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटूंबीयांकडून गुरुवारी सायंकाळी काशिमिरा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार गीता जैन ,माजी आमदार नरेंद्र मेहता , शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हजरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचे छायाचित्र स्वतः गीता जैन यांनी तर समाज माध्यमांवर प्रसिद्ध केले आहे. यावर जागरूक नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तसेच गुंड प्रवरीत्तीच्या पटेल यांना स्थानिक राजकिय नेत्यांचा वरदहस्त आहे का?, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतांसाठी राजकीय नेते कार्यक्रमाला उपस्थित होते का? ,पटेल आगामी काळात राजकारणात उतरणार का ?असे सवाल उपस्थित केले जात आहे. यावर मेहतांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहण्याचे सांगितले. तर, जैन यांच्याशी संपर्क केला असता त्यानी प्रतिसाद दिला नाही.
पालघरमध्ये जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
पालघर जिल्ह्यात पुन्हा आज शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले आहेत जिल्ह्यातील डहाणू, गांजा, कासा या परिसरामध्ये भूकंपाचे हे धक्के बसले आहेत, शनिवारी साडेसहा वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवलेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.