लोकसभेआधी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, चार महिन्यांनी पाटलांचे काँग्रेसमधून निलंबन, कारवाईवर संशय

अंबरनाथ : अंबरनाथ येथील काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र प्रदीप पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला होता. यावेळी काँग्रेसचे काही माजी नगरसेवकही पाटील यांच्यासोबत शिवसेनेत गेले होते. परंतु त्यावेळी काँग्रेस संघटनेने कोणतेही पाऊल उचलले नाही. आता उशिरा जाग आल्यानंतर पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मात्र ही ४ महिन्यांनी झालेली कारवाई संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रदीप पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ शहरातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. याला आता चार महिने उलटले. उशिरा जाग आलेल्या काँग्रेस पक्ष संघटनेने १६ ऑगस्ट रोजी प्रदीप पाटील यांचं निलंबन केल्याचं पत्र जारी केलं.
Sanjay Raut : बंदर का बेटा… शिंदे नाक घासत म्हणाले लेकाचं हॉस्पिटल चालत नाहीये, ठाकरेंनी खासदार केला, संजय राऊतांचा निशाणा
काँग्रेसचे प्रशासन आणि संघटन प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी हे पत्र जारी केलं. मात्र शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ४ महिन्यांनी गावंडे यांनी हे पत्र का जारी केलं असावं? असा सवाल आता पाटील यांचे समर्थक करू लागले आहेत. ४ महिन्यांनी झालेली कारवाई संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच योग्य निर्णय घेतील, असाही दावा प्रदीप पाटील समर्थकांनी केला आहे.
Supriya Sule on Ladki Bahin : लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला न आल्यास फॉर्म रद्द, धमकीचा मेसेज, सुप्रिया सुळेंचा संताप, हिंमत असेल तर…

कोण आहेत प्रदीप पाटील?

प्रदीप पाटील हे १९९५ पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून विरोधी पक्षनेते सुद्धा त्यांनी भूषवले आहे. अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची धुरा एकहाती सांभाळली होती.

शिंदेंच्या शिवसेनेत कोणी कोणी प्रवेश केला होता?

प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ, चरण रसाळ, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, बबन तांबे, मनोज देवडे, बिस्मिल्ला शेख, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा, नयना पवार, विद्या नागदिवे, अर्चना प्रसाद, मनीषा परमल, युथ काँग्रेसचे हर्षल भोईर, देवराज अल्झानडे, संकेत तांबे, आशिष डुबली ईशान जाधव, अश्फाक खान, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव, ज्ञानेश्वर शेलार, अनिल कांबळे, प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूकीच्या आधी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Source link

lok sabha election 2024maharashtra assembly election 2024Maharashtra politicsVidhan Sabha Nivadnukएकनाथ शिंदे शिवसेनाकाँग्रेस नेता शिवसेना प्रवेशनाना पटोलेप्रदीप पाटील काँग्रेसप्रदीप पाटील शिवसेना प्रवेश
Comments (0)
Add Comment