सत्तेत आम्हीच येणार, बिर्याणीवाले वाचवणार नाहीत; नितेश राणेंची पुन्हा पोलिसांना धमकी

उल्हासनगर, प्रदीप भणगे : ‘जोपर्यंत यांच्या घरात लव्ह जिहाद होत नाही, तोपर्यंत यांना झळ बसणार नाही’, असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसंच ‘तुम्हाला बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत आणि आम्ही काही सरकारमधून जात नाही हे लक्षात ठेवा’, असं म्हणत त्यांनी पोलिसांनाही थेट इशारा दिला.तसेच राणे यांनी ‘उनका अली, हमारा बजरंग बली’ अशी घोषणा देत भाषण केलं.Nitesh Rane warns Police : पोलिसांनो, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पोस्टिंग करुन, बायकोला फोनही लागणार नाही, नितेश राणेंचा दम

उल्हासनगरमध्ये हिंदू मुलीच्या मुस्लिम धर्मांतराविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा आज काढण्यात आला होता. याच मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. मोर्चापूर्वी त्यांनी धर्मांतर झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेत त्यांची कहाणी ऐकली. याच मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांनी वेळीच सहकार्य न केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. यानंतर उल्हासनगरच्या तहसीलदार कार्यालयापर्यंत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यानंतर बोलताना नितेश राणे यांनी ‘उनका अली, हमारा बजरंग बली’ अशी घोषणा देत भाषणाची सुरुवात केली. ‘उल्हासनगरच्या एकेका घरात ४०-४० बांगलादेशी आणि रोहिंगे राहात असून ते कुणाच्या परवानगीने इथे राहत आहेत?’ असा सवाल नितेश राणे यांनी केला. त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नसल्यामुळे ‘तुम्ही आम्हाला फक्त २४ तास द्या, या २४ तासात या सर्वांना इथून साफ करून टाकू!’ असा आव्हान त्यांनी पुन्हा दिले आहे.

तसंच ‘आम्ही काही सरकारमधून जात नाही. तुमचं जे काही आहे, ते आमच्याच हातात आहे. तुम्हाला हे बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत’, असं म्हणत त्यांनी पोलिसांना इशारा दिला. तसंच ‘हा मोर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांविरोधात जर गुन्हे दाखल केले, तर पोलीस स्टेशनला येऊन तांडव करेन’, असंही वक्तव्य नितेश राणे यांनी यावेळी केलं. यानंतर उल्हासनगरच्या तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी दिलं. तसंच या सगळ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

Source link

communal disputeulhasnagar hindu jan akrosh morcha newsउल्हासनगरनितेश राणेरोहित पवारलव्ह जिहादहिंदू जनआक्रोश मोर्चाहिंदू मुस्लिम धर्मांतर
Comments (0)
Add Comment