हा त्रास मी सहन करू शकत नाही; मनोज जरांगेंनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा

जालना: मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठयांना मदत करणे सरकारने थांबवले आहे. फडणवीसांनी ही मदत रोखली आहे, तातडीने ही मदत वाटप सुरू करावी अन्याथा राज्यात पुन्हा मोठे आंदोलन उभे करीन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. सरकार गोरगरीब मराठ्यांना जाणून बुजून त्रास देत आहे. त्यामुळे हा त्रास मी सहन करू शकत नाही. हा त्रास असाच सुरू राहिल्यास राज्यात आणखी मोठे आंदोलन उभे करीन असा इशाराही यावेळी जरांगे यांनी अंतरवालीत दिला.

जुन्या कुणबी नोंदी सापडूनही अधिकारी दखल घेत नाहीत. सरकारने या अधिकाऱ्यांना समज द्यावी. तसेच गावा-गावातील मराठ्यांनी घरातील जुन्या दस्तवेजात देखील जुन्या नोंदी शोधाव्या. ग्रामपंचायतीत देखील गावा-गावात नोंदी शोधाव्या असे, आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले.
Maharashtra Election Opinion Poll: महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येणार? ओपिनियन पोलने दिले धक्कादायक उत्तर, कोणाला किती जागा मिळणार जाणून घ्या
आतापर्यंत 500 ते 700 इच्छुकांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला आहे. 20 तारखेपर्यंत आम्ही डेटा स्वीकारु असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.मात्र इच्छूक कितीही असोत आम्ही फक्त एकालाच उमेदवारी देऊ असेही यावेळी जरांगे म्हणाले.
Haryana Election Report: हरियाणा विधानसभेचा ‘एक्स रे रिपोर्ट’; भाजप बॅकफूटवर, फायदा घेण्याऐवजी काँग्रेसचे पाहा काय चाललंय

बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी आज जरांगे पाटील यांची अंतरवलीत येऊन भेट घेतली. यावर बोलताना त्यांच्याशी बीड विधानसभा मतदार संघाबाबत चर्चा झाली नाही, मात्र इच्छुक असणे हा दोष नाही इच्छुक कुणीही असू शकतो. काही जण टोमणे मारत असल्याने प्रत्येकाला आत्ता कळपात येण्याची मजा वाटते, असा टोला जरांगे यांनी पंकजा मुंडे यांचं नाव न घेता हाणला.

काय म्हणाले जरांगे पाटील

– आम्ही कुणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही, जे सोशल मीडियावरून उमेदवारी जाहीर केल्याची अफवा पसरवतायात त्यांनी ही अफवा पसरवण बंद करावं-जरांगे
– जर मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीनं मदत वाटप सुरू केली नाही तर राज्यात पुन्हा आंदोलन उभं करीन,सरकारला जरांगे यांचा इशारा
– आतापर्यंत 500 ते 700 इच्छुकांचा डेटा आम्हाला मिळाला आहे
– आम्ही फक्त एकालाच उमेदवारी देणार

Source link

manoj jarange patil latest newsmanoj jarange patil warning to state governmentmaratha reservation latest newsmaratha reservation newsउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षणमराठा आरक्षण आंदोलन
Comments (0)
Add Comment