आयुक्त शुभम गुफ्तांची सांगलीतून हकालपट्टी करा; सांगली महापालिकेतील कारभाराचीही चौकशी करण्याची मागणी

सांगली: गडचिरोली जिह्यातील भामरागड आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुधाळ गाय वाटप योजनेत कोटयवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या महापालिका आयुक्त व प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम गुफ्ता यांना सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे सदर भ्रष्टाचारी आयुक्तांची सांगली जिह्यातून हकालपट्टी करावी तसेच त्यांचे आयएएस पदही रद्द करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते इंद्रजितदादा घाटे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच सांगली महापालिकेत प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आयुक्त गुफ्ता यांनी केलेल्या विविध कामांचीही खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गडचिरोली जिह्यातील भामरागड आदिवासी विकास प्रकल्पात तत्कालीन प्रकल्प अधिकारी असलेल्या शुभम गुफ्ता यांनी कोटयवधी रुपये भ्रष्टाचार केल्याचे समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. आदिवासी समाजातील गरीब लाभार्थ्यांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांना धमकावून योजनेचे पैसे लाभार्थ्यांना न देता इतर खात्यांवर वळवून हडप केल्याचा ठपका शुभम गुफ्ता यांच्यावर बसला आहे. त्यामुळे त्यांचा सांगली महापालिकेतील कारभारही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सदर आयुक्तांच्या भ्रष्टाचाराबाबत केंद्र सरकारकडे अहवाल गेला असून, त्यांच्यावर काय कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे.
हा त्रास मी सहन करू शकत नाही; मनोज जरांगेंनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा

सांगलीच्या आयुक्तांवर भ्रष्टाचाराचे आरोप निष्पन्न होताच युवानेते इंद्रजितदादा घाटे आक्रमक झाले आहेत. लाखो रुपयांचा पगार घेऊनही असे आयएएस दर्जाचे प्रशिक्षणार्थी अधिकारी गोरगरीब जनतेच्या योजनेचे पैसे हडप करतात, ही लांछणास्पद बाब असल्याचे घाटे यांनी म्हटले आहे. सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झालेल्या शुभम गुफ्ता यांचा कारभार सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. आता गडचिरोली जिह्यातील प्रकरणावरुन आयुक्त शुभम गुफ्ता हे भ्रष्टाचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही. त्यामुळे शासनाने सदर भ्रष्ट आयुक्तांची सांगलीतून हकालपट्टी करावी, अशी मागणी इंद्रजितदादा घाटे यांनी केली.
Maharashtra Election Opinion Poll: महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येणार? ओपिनियन पोलने दिले धक्कादायक उत्तर, कोणाला किती जागा मिळणार जाणून घ्या

घाटे पुढे म्हणाले, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेला एक प्रकारची कीड लागली आहे. लाखोंचा पगार घेऊनही गरीबांना लुटणारे हे अधिकारी प्रशासकीय सेवेतील कलंक म्हणावे लागतील. राजकीय वरदहस्ताने या आयुक्तांना सांगली महापालिकेचा कारभार दिला. त्यांच्या नियुक्तीपासून अनेक कामांचा धडका झाला. आधीपासूनच आयुक्त गुफ्तांचा कारभार वादग्रस्त ठरला आहे. ते एखाद्या कॉर्पोरेट अधिकाऱ्याप्रमाणे वागतात. त्यांना सामान्यांच्या व गरीबांच्या प्रश्नांची जाण नाही. एसीखाली बसून, भ्रष्टाचारी लोकांपासून त्यांचे लागेबांधे असून, सांगली महापालिकेतही या आयुक्तांनी अनेक भ्रष्टाचार केला नसेल का? असा सवाल करत आयुक्त शुभम गुफ्ता यांच्या कार्यकाळातील सांगली महापालिकेतील कामांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी इंद्रजितदादा घाटे यांनी केली. सदर आयुक्तांची हकालपट्टी करुन एक सक्षम, निष्पक्ष आणि स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी सांगली महापालिकेचा आयुक्त म्हणून नियुक्त करावा, या मागणीसाठी विभागीय आयुक्तांना भेटून निवेदन देणार असल्याचेही इंद्रजितदादा घाटे यांनी यावेळी सांगितले.

Source link

sangli municipal corporation newssangli news todayआयएएस अधिकारी शुभम गुफ्तासांगली ताज्या बातम्यासांगली न्यूजसांगली महापालिका
Comments (0)
Add Comment